तुम्ही पाहिलं का? अवकाशात सूर्य उगवताना 'असा' दिसला; NASA नं क्लिक केलं जबरदस्त दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 07:58 PM2020-07-28T19:58:13+5:302020-07-28T20:06:07+5:30

वेळी त्यांनी आपल्या कॅमेरात सूर्योदयाचे (Sunrise From Space) फोटो टिपले आहेत. काही तासांपूर्वीच ट्विटरवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. 

nasa astronaut captured pictures of sunrise from space images got viral in social media | तुम्ही पाहिलं का? अवकाशात सूर्य उगवताना 'असा' दिसला; NASA नं क्लिक केलं जबरदस्त दृश्य

तुम्ही पाहिलं का? अवकाशात सूर्य उगवताना 'असा' दिसला; NASA नं क्लिक केलं जबरदस्त दृश्य

Next

नासामधील अंतराळ प्रवासी बॉब बेहेनेकेन (Astronaut)  यांनी सोशल मीडियावर अंतराळ स्थानकातील (Space Station) आश्चर्यचकित करणारे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अंतराळातील वीजा चमकल्याचा व्हिडीओ पोस्ट करणारे बॉब हे अंतराळात प्रवास करत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या कॅमेरात सूर्योदयाचे (Sunrise From Space) फोटो टिपले आहेत. काही तासांपूर्वीच ट्विटरवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. 

सोशल मीडियावर हा फोटो शेअर केल्यानंतर ५७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसंच ९ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आणि रिट्वीट्सही आले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओला तुफान पसंती दिली आहे. एका युजरने म्हटले आहे की यापेक्षा सुंदर फोटो असूच शकत नाही. 

द अटलांटिकच्या माहितीनसार आंतराराष्ट्रीय अंतराळ स्थानक प्रत्येक ९० मिनिटांनी पृथ्वीची  परिक्रमा पूर्ण करते. प्रत्येक ९० मिनिटाला अंतराळातील प्रवासी सुर्योदयाचे साक्षी ठरतात. एका दिवसात एकूण १६ सुर्योदय असतात.  २ ऑगस्टला अंतराळ प्रवासी बॉब बेहेनेकेन हे पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. हे फोटो पाहून नेटकरी तुफान खुश झाले आहेत. 

जिंकलस पोरी! वडिल फुटपाथवर चपला विकायचे, ८ तास अभ्यास करून मुलगी राज्यात तिसरी आली

खुशखबर! कोरोनाचं 'हे' औषध ऑगस्टमध्ये येणार, किंमत आणि कुठे उपलब्ध होणार, जाणून घ्या

Web Title: nasa astronaut captured pictures of sunrise from space images got viral in social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.