खेळता खेळता भरधाव ट्रकसमोर आला मुलगा, बापाने थांबवण्याचा प्रयत्न केला, डोळेच मिटले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:32 IST2025-01-23T18:31:55+5:302025-01-23T18:32:19+5:30
रस्त्यावरून जात असताना किंवा आजुबाजुला असताना वाहनांपासून मुलांना सावध प्रत्येक पालक करत असतो. परंतू, अशा अनेक घटना घडतात की मुलांना गाड्यांनी उडविल्याचे प्रकार घडतात.

खेळता खेळता भरधाव ट्रकसमोर आला मुलगा, बापाने थांबवण्याचा प्रयत्न केला, डोळेच मिटले...
अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवेल असा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होऊ लागला आहे. बाप त्याच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात होता, यावेळी लहान मुलगाही त्याच्यासोबत येण्यासाठी हट्ट करत होता. रस्त्याच्या बाजुला घर होते. मुलगा धावत आला आणि रस्त्यावर गेला, समोरून भरधाव वेगात ट्रक गेला. बापाने त्याला धरण्याचा, थांबविण्याचा प्रयत्न केला. पण... काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ अनेक गोष्टी सांगून जाणारा आहे.
रस्त्यावरून जात असताना किंवा आजुबाजुला असताना वाहनांपासून मुलांना सावध प्रत्येक पालक करत असतो. परंतू, अशा अनेक घटना घडतात की मुलांना गाड्यांनी उडविल्याचे प्रकार घडतात. परंतू, या व्हिडीओतील मुलगा थोडक्यात वाचला आहे.
देव तारी त्याला कोण मारी असाच हा प्रकार आहे. बाप स्कुटरवर होता, त्याच्या मागे त्याची मुलगी बसलेली होती. लहान असलेला मुलगा धावत रस्त्यावर गेला, तितक्यात एक ट्रक भरधाव वेगात आला. बापाने त्याला त्या क्षणी वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू तो त्याच्या हातापासून लांब होता. ट्रकला आदळणार एवढ्यातच तो मुलगा मागे वळला आणि वाचला. बापाच्या डोळ्यासमोर काय घडणार होते ते तरळले. त्याला धक्का बसला, डोक्याला हात लावत त्याने क्षणभर डोळे मिटले आणि त्याच्या लगेचच स्वत:ला सावरले आणि मुलाला घेण्यासाठी प्रयत्न केला.