Australian Skydiver Parachute Viral Video: सोशल मीडियावर चित्तथरारक व्हिडीओ व्हायरल होणे हे नवीन नाही. स्कायडायव्हिंग हा एक साहसी क्रीडाप्रकार आहे. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. या व्हिडीओंमधून अनेकांना प्रेरणा मिळते. पण काही व्हिडीओ असे असतात ज्याने काळजाचा ठोका चुकतो. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात १५,००० फूट उंचीवरून उडी घेतल्यानंतर एका ऑस्ट्रेलियन स्कायडायव्हरचा पॅराशूट विमानालाच अडकला. क्वीन्सलँडमधील मिशन बीच येथे ही थरारक घटना घडली, ज्याचे नाट्यमय फुटेज ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरो (ATSB) ने जारी केले.
नेमके काय घडले?
‘बिग वेज ॲट द बीच’ या कार्यक्रमादरम्यान, स्कायडायव्हरने १६-वे फॉर्मेशन जम्पसाठी सेसना कारवाँ (Cessna Caravan) विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. विमानाचा रोलर दरवाजा उघडताच, बाहेर पडणाऱ्या पहिल्या स्कायडायव्हरच्या रिझर्व्ह पॅराशूटचे हँडल विमानाला असलेल्या विंग फ्लॅपमध्ये अडकले. यामुळे पॅराशूट तात्काळ उघडले गेले आणि स्कायडायव्हर विमानाबाहेर लटकला. तो विमानाचे पंख आणि मागची बाजू या भागाजवळ अडकला. सुमारे १५,००० फूट उंचीवर हा प्रकार घडत होता. त्यामुळे साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. ही संपूर्ण घटना स्कायडायव्हरच्या हेल्मेट कॅमेरात आणि विमानावर लावलेल्या दुसऱ्या कॅमेरात कैद झाली.
स्कायडायव्हर कसा वाचला?
प्रसंगावधान राखत स्कायडायव्हरने त्वरित अपेक्षित कृती केली. त्याने सोबत असलेल्या 'हुक नाइफ' (Hook Knife) चा वापर करून पॅराशूटच्या दोऱ्या कापल्या आणि स्वतःला विमानापासून मुक्त केले. दोऱ्या कापल्यानंतर तो मुक्तपणे खाली पडू लागला (Freefall). पण काही क्षणातच, त्याने यशस्वीरित्या आपले दुसरे मुख्य पॅराशूट उघडले आणि सुरक्षितपणे जमिनीवर उतरला. या जीवघेण्या दुर्घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली, पण सुदैवाने त्याचा जीव मात्र वाचला.
ATSB च्या अहवालानुसार, हा स्कायडायव्हरचा एक 'narrow escape' होता. या घटनेमुळे स्कायडाईव्हिंग दरम्यान सुरक्षितता प्रक्रियेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियन पॅराशूट फेडरेशन (APF) आता अशा प्रकारच्या परिस्थितीत 'लोड मास्टर्स'ची भूमिका आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे.
Web Summary : An Australian skydiver's parachute got caught on the plane after jumping from 15,000 feet. He used a hook knife to cut the lines and deployed his reserve parachute, landing safely with minor injuries. The incident highlights skydiving safety protocols.
Web Summary : ऑस्ट्रेलियाई स्काईडाइवर का पैराशूट 15,000 फीट से कूदने के बाद विमान से उलझ गया। उसने हुक चाकू से रस्सियाँ काटकर रिजर्व पैराशूट खोला और मामूली चोटों के साथ सुरक्षित उतरा। घटना स्काईडाइविंग सुरक्षा प्रोटोकॉल पर प्रकाश डालती है।