शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

माणुसकीला सलाम! मुस्लिम तरूणांनी हिंदू महिलेला दिला खांदा; कोरोनानं मृत्यू झाल्याचं कळताच पळून गेला मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 19:14 IST

Viral News : त्यांचा मुलगा आणि जवळील लोक घाबरले आणि कोरोना संक्रमणामुळे त्यांना मृत्यूची भीती वाटली.

कोरोनाकाळात माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या अनेक घटना देशाच्या वेगवेगळ्या भागातून समोर येत आहेत. जिल्ह्यातील राणीगंज पंचायतीच्या तेतरिया गावात मुस्लिम समाजातील लोकांनी पुन्हा एकदा आदर्शाचे एक उदाहरण मांडले आहे. दिग्विजय प्रसाद यांची ५८ वर्षांची पत्नी पार्वती देवी कित्येक महिन्यांपासून आजारी होती. त्यांना उपचारासाठी पीएचसीमध्ये दाखल केले गेले, तिथे बरे झाल्यानंतर कोरोना तपासणी करण्यात आली. हा अहवाल नकारात्मक आल्यानंतर घरी जात असताना त्यांचा मृत्यू झाला. यावेळी, त्यांचा मुलगा आणि जवळील लोक भीतीने घाबरले आणि कोरोना संक्रमणामुळे त्यांना मृत्यूची भीती वाटली.

काही वेळानंतर जेव्हा मयत महिलेला घेऊन कोणीही घराबाहेर पडलं नाही तेव्हा मुस्लिम समाजातील लोकांनी मृत महिलेच्या मुलाकडे मदत मागितली. मुलाने नकार देताच , मुस्लिम समुदायाचे मो. रफिक, मो कलाम, मो ललित, मो लादेन आणि मो शरीक पुढे आले. आधी तिरडी बांधण्यात आली आणि मग त्यांनी या वृद्ध महिलेची अंघोळ केली  आणि हिंदू प्रथांनुसार अंतिम संस्कार केले.

मो. रफिक म्हणाले की, ''एखाद्याने धर्माच्या आधारे भेदभाव करू नये. मानवांनी मानवासाठी उपयोगी पडावे, आम्हीही तेच केले. महिलेच्या मृत्यूनंतर अशी अवस्था झाली की लोकांनी त्यांच्या घराचे दरवाजे बंद केले. प्रत्येकाला वाटले की बाई कोरोनामुळे मरण पावली आहे. म्हणून कोणीही त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे आले नाही. त्यानंतर महिलेच्या इतर नातेवाईकांना विचारात घेऊन आम्ही तयारी करायला सुरूवात केली.''

हिंदू मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र आले मुस्लिम बांधव

 मृत्यूनंतर आपल्याच लोकांना खांदा देण्याचीही परवानगी प्रशासन देत नाहीये. अशा दुर्दैवी परिस्थितीत औरंगाबाद शहरातून मानवतेचा संदेश देणारी एक घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरात रमजानच्या दिवसात रोजा ठेवणारे मुल्सिम बांधवांनी आपल्या हिंदू मित्राच्या मुलाचा अंत्यसंस्कार पूर्ण हिंदू रितीरिवाजाप्रमाणे केला. या घटनेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं

खांद्यावर मृतदेह घेणारे दाढी, टोपी आणि रूमाल ठेवलेले हे चेहरे सिनेमातील सीन नाही. औरंगाबादमधील हे सत्य चित्र आहे. औरंगाबादच्या सिटी चौक सराफा भागात राहणारे दलाल हार्डी यांचा मुलगा सुबोध याची ही अंत्ययात्रा आहे. कैलाश नगरच्या स्मशानभूमीत १५ वर्षीय सुबोधला अग्नि देण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन केली.

 आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

सुबोध हा जन्मताच दिव्यांग होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यावर अनेक उपचार केले. पण ते मुलाला वाचवू शकले नाहीत. सुबोधच्या मृत्यूची बातमी शेजारी राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना समजली तर त्यांनी सुबोधच्या अंत्यसंस्काराची पूर्ण व्यवस्था केली. इतकेच नाही तर सर्व जबाबदारी त्यांनीच पार पाडली. पूर्ण हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सुबोधला स्मशानभूमीत घेऊन गेले आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाMuslimमुस्लीमHinduहिंदूBiharबिहार