शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

अरेरे! लॉकडाऊनमुळे आईची नोकरी गेली; १४ वर्षीय मुलगा रस्त्यावर चहा विकून चालवतोय घर

By manali.bagul | Updated: October 30, 2020 17:19 IST

Viral News In Marathi : लोकांनी शुभनसाठी मदतीचा हात  दिला आहे, तर काहींनी शुभनच्या जिद्दीला सलाम केलं आहे. 

मेहनत करून, गरिबीतून वर येत  शिक्षण घेत असलेल्या अनेक होतकरू मुलांच्या कहाण्या तुम्ही याआधी ऐकल्या असतील. आज आम्ही तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावर चहा विकून घर चालवत असलेल्या एका  १४ वर्षीय  मुलाच्या संघर्षाबद्दल सांगणार आहोत. या चिमुरड्याचे नाव  शुभन आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारात लॉकडाऊन झाल्यानंतर त्याच्या आईला काम मिळणं पूर्णपणे बंद झालं. अशा कठीण परिस्थिती घर चालवण्यासाठी पोरानं घराची संपूर्ण जबाबदारी घेतली. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून  शुभनची कहाणी व्हायरल होत आहे. लोकांनी  शुभनसाठी मदतीचा हात  दिला आहे. तर काहींनी  शुभनच्या जिद्दीला सलाम केलं आहे. 

वृत्तसंस्था एनएनआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. १४ वर्षीय  शुभन आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी चहा विकण्याचे काम करत आहे. कोरोनामुळे त्यांच्या आईची नोकरी गेली.  शाळेच्या बसची अटेंडंट म्हणून शुभनची आई काम करत होती. पण लॉकडाऊन असल्यामुळे शाळा आणि शाळेच्या बस पूर्णपणे बंद होत्या म्हणून रोजगार मिळणंही बंद झालं. ७ महिन्यांपासून लांब होतं लेकरू; बापानं ३७ तास स्कूटर चालवून चिमुरड्यासाठी गाव गाठलं

१२ वर्षांपूर्वी शुभनच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आईच्या कमाईनेच घर चालत होतं. शुभनची बहिण सध्या लॉनलाईन क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा अभ्यासाला करायला सुरू करणाार असल्याचे शुभनने सांगितले.  नागपाडा, भेंडी बाजारातील एका दुकानात चहा बनवून नागपाडा आणि इतर परिसरात शुभन चहा विकतो. दिवसभरातून  ३०० ते ४०० रुपये कमवून आईकडे देत असल्याचे ही सुभानने सांगितले. सोशल मीडिया युजर्सनी शुभनचे कौतुक केले आहे तर अनेकांनी मदतीचे आवाहन केलं आहे. मानलं गड्या! पार्ट टाईम जॉब म्हणून मास्तरानं सुरू केली शेती अन् आता घेतोय १ कोटींची कमाई

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी