माता न तू वैरीणी! आईनेच ढकलले बाळाला पाण्यात, व्हिडिओ पाहुन नेटकरी संतप्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 18:23 IST2021-07-25T18:20:23+5:302021-07-25T18:23:05+5:30
या व्हिडिओतील आईला पाहुन तुमचा संताप अनावर होणार नाही. हा व्हिडिओ पाहताक्षणी तुमचा आईच्या प्रेमावरून विश्वास उडून जाईल. या व्हिडिओत एक आई आपल्या मुलाला चक्क पाण्यात ढकलुन देतेय...

माता न तू वैरीणी! आईनेच ढकलले बाळाला पाण्यात, व्हिडिओ पाहुन नेटकरी संतप्त...
हा व्हिडिओ पाहुन तुमच्या काळजाचा थरकाप होईल. या व्हिडिओतील आईला पाहुन तुमचा संताप अनावर होणार नाही. हा व्हिडिओ पाहताक्षणी तुमचा आईच्या प्रेमावरून विश्वास उडून जाईल. या व्हिडिओत एक आई आपल्या मुलाला चक्क पाण्यात ढकलुन देतेय...
या व्हिडिओत आई मुलाला पाण्यात ढकलते मुल गटांगळ्या खात सरळ होताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ बातमी देईपर्यंत १० लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. इन्स्टाग्रामवर विअर्ड विड्ज नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
ही आई आपल्या मुलाला पोहायला शिकवण्यासाठी त्याला पाण्यात ढकलतं आहे. या व्हिडिओवर अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी आईची पोहायला शिकवण्याची पद्धत चुकीची असल्याचं म्हटलं आहे. काहीजण तर तिला राक्षसीण ठरवत आहेत तर काही जण इतक्या लहान मुलाला घेऊन स्विमिंग पुलमध्ये जाण्याची गरज काय? असा प्रश्न विचारत आहेत. काहीजणांनी मात्र आईची बाजू घेत मुलांना स्विमिंग शिकवण्याचे हे योग्य वय असून आई योग्य पद्धतीने ते शिकवत आहेत असे म्हटले आहे.