हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आई, २ वर्षांपासून एकटाच राहतोय ९ वर्षांचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:11 IST2025-03-22T11:11:19+5:302025-03-22T11:11:28+5:30

एक ९ वर्षांचा मुलगा दोन वर्षांपासून फ्लॅटमध्ये एकटाच राहिला कारण त्याची आई त्याला सोडून तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी निघून गेली होती. 

mother ran away with boyfriend 9 year old child lived alone in the flat for 2 years | हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आई, २ वर्षांपासून एकटाच राहतोय ९ वर्षांचा मुलगा

हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आई, २ वर्षांपासून एकटाच राहतोय ९ वर्षांचा मुलगा

फ्रान्समधील नेरसॅक या छोट्या शहरातून भयानक घटना समोर आली आहे. एक ९ वर्षांचा मुलगा दोन वर्षांपासून फ्लॅटमध्ये एकटाच राहिला कारण त्याची आई त्याला सोडून तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी निघून गेली होती. 

२०२० ते २०२२ पर्यंत हा मुलगा थोडफार अन्न खाऊन आणि शेजाऱ्यांच्या मदतीने जगला. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याची आई अधूनमधून यायची, जेवण द्यायची आणि निघून जायची. फक्त ५ किलोमीटर अंतरावर राहूनही तिने कधीही आपल्या मुलाला आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला नाही.

मुलगा रोज एकटाच शाळेत जात राहिला आणि कोणालाही त्याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. पण जेव्हा शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं तेव्हा ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलीस फ्लॅटमध्ये दाखल झाले तेव्हा तेथील दृश्य पाहून ते हादरले. फ्रीज पूर्णपणे रिकामा होता आणि सर्वत्र केकचे रॅपर्स होते. 

पोलिसांनी त्या मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की, तो दोन वर्षांपासून एकटाच राहत होता आणि त्याची आई त्याला क्वचितच भेटायला येते. यानंतर, पोलिसांनी ३९ वर्षीय अलेक्झांड्राचा शोध सुरू केला. ती सिरुइल सिटीतील तिच्या प्रियकराच्या घरी सापडली. आजूबाजूच्या लोकांकडून चौकशी केल्यावर कळलं की तिने आपल्या मुलाबद्दल सर्व काही लपवून ठेवलं होतं.

चौकशीदरम्यान, ९ वर्षांच्या मुलाच्या आईने दावा केला की, तिचा मुलगा नेहमीच तिच्यासोबत राहतो, परंतु ती खोटं बोलत आहे. पोलीस तपासात हे संपूर्ण प्रकरण खोटं असल्याचं सिद्ध झालं, त्यानंतर महिलेला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. जेव्हा न्यायाधीशांनी विचारलं की, तिचा मुलगा दोन वर्षांपासून एकटा का आहे? तेव्हा महिलेने उत्तर दिलं की, ती दररोज तिच्या मुलाला शाळेत सोडते. पण मुलगा असं का म्हणतो हे माहीत नाही. 
 

Web Title: mother ran away with boyfriend 9 year old child lived alone in the flat for 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.