शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कडक उन्हात 2 वर्षांच्या लेकीला कारमध्येच विसरली आई; 15 तासांनी आठवलं, परत आल्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 09:30 IST

दोन्ही मुलं झोपली होती. त्यांची आई त्यांना कामध्येच विसरली. जवळपास 15 तास मुलं कारमध्येच बंद होती.

कडक उन्हात कारमध्ये अडकून एका 2 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जवळपास मुलगी 15 तास कारमध्ये राहिली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील क्रिस्टोफर मकलीन आणि आई कॅथरीन एडम्स यांना अटक केली आहे. मुलीच्या शरीराचे तापमान 41.6 अंशांवर पोहोचले होते. कारमध्ये एक 4 वर्षांचा मुलगाही बंद होता, मात्र तो सुदैवाने यातून वाचला आहे. त्याला सध्या बाल संरक्षण सेवांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. या प्रकरणाचा तपास केला असता या मुलांची आई त्यांना कारमध्ये विसरल्याचे आढळून आले. तिला जेव्हा याची आठवण आली. तेव्हा ती कारजवळ परतली मात्र चिमुरडी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिने लगेचच इमर्जन्सी नंबरवर कॉल केला. त्यानंतर वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

कारमध्ये झोपलेली मुलं

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ही दोन्ही मुलं झोपली होती. त्यांची आई त्यांना कामध्येच विसरली. जवळपास 15 तास मुलं कारमध्येच बंद होती. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दोन्ही मुलं कारमध्ये झोपली होती. मुलांना गाडीत सोडून ती घरी झोपायला गेली. दुपारी 3.41 वाजता झोप झाली आणि तेव्हा मुलं गाडीत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पोलिसांनी दाम्पत्याच्या घराची झडती घेतली असता तेथे ड्रग्ज सापडले. 

अधिकाऱ्याने मुलीचा मृत्यूचे कारण देखील ड्रग्ज असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले की ड्रग्जमध्ये व्यक्ती वास्तविक जगात काय चालले आहे ते विसरते आणि मग अशा गोष्टी घडतात. पोलिसांनी एडम्स आणि मकलीला अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ बाळगणे आणि मुलाकडे निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.