Video - मां तुझे सलाम! मुलाला कुशीत घेऊन ई-रिक्षा चालवते आई; लोकांनी केला जिद्दीला सलाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 15:17 IST2023-07-08T15:09:24+5:302023-07-08T15:17:08+5:30
आई आपल्या मुलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी काहीही करू शकते.

Video - मां तुझे सलाम! मुलाला कुशीत घेऊन ई-रिक्षा चालवते आई; लोकांनी केला जिद्दीला सलाम
आईची जागा आपल्या आयुष्यात दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. आई आपल्या मुलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी काहीही करू शकते. इंटरनेटवर अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यावरून असं दिसून येतं की अनेक आईनी आपल्या लेकरांसाठी खूप अडचणींचा सामना केला आहे आपल्या मुलाचं पालनपोषण करण्यासाठी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केल्या आहेत. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे.
आता अशाच एका ई-रिक्षा चालवणाऱ्या आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्राम तसेच ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आपली ई-रिक्षा चालवत असून ग्राहकांशी संवाद साधताना दिसत आहे. व्हिडीओ नीट बारकाईने पाहिल्यावर, तुम्हाला तिच्या कुशीत एक लहान मुल दिसेल. काही वेळाने ती महिला तिथून निघून जाते.
हालातों की जलती धूप में
— खामोश कलम🖋️🖋️ (@khamosh_kalam) July 5, 2023
वो हवा सर्द बन जाती है ........
.
.
.
.
वो नाजुक सी दिखने वाली "मां"
औलाद के लिए "मर्द" बन जाती है.......!!!! pic.twitter.com/DdMxNlkWxy
सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत असून सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या आईचं लोकांनी भरभरून कौतुक केलं आहे. तिला आर्थिक मदत व्हावी म्हणून अनेकांनी महिलेचा पत्ता विचारला. काहींनी तिच्या धाडसाचे आणि जिद्दीचे कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.