'कोंबडा-नागीन' सगळं फेल, आता 'मोर डान्स'चा जलवा; लोक म्हणाले...ह्यो अंड दिल्याविना थांबूचो न्हाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 13:09 IST2023-03-08T13:07:17+5:302023-03-08T13:09:42+5:30
Funny Dance Video: लग्न असो की पार्टी, डान्सशिवाय सगळी मजा वाया जाते. डान्सची खरी मजा गावातील लग्नांमध्ये येते.

'कोंबडा-नागीन' सगळं फेल, आता 'मोर डान्स'चा जलवा; लोक म्हणाले...ह्यो अंड दिल्याविना थांबूचो न्हाय!
Funny Dance Video: लग्न असो की पार्टी, डान्सशिवाय सगळी मजा वाया जाते. डान्सची खरी मजा गावातील लग्नांमध्ये येते. इथले लोक असे अजब डान्स स्टेप्स करतात ज्याला काहीच तोड नसते. कोंबडा डान्स असो किंवा मग नागीन डान्स हे देखील याचाच एक भाग. सध्या मोर डान्स इंटरनेटवर खूप व्हायरल झाला आहे. मोर डान्सच इतका अप्रतिम आहे की, तुम्हाला हसू आवरणार नाही.
हा व्हिडिओ एका पार्टीत शूट करण्यात आल्याचं दिसतं. यामध्ये दोन मुलं मधोमध उभी असून त्यांचे सहकारी उत्साह वाढवाताना दिसतात. यानंतर एक मुलगा अशा पद्धतीने नाचतो की तुम्ही नागीन आणि कोंबडा डान्सही विसरून जाल. अतिशय मजेशीर डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर yogesh_club नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही सेकंदांची ही क्लिप इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली आहे. या व्हिडिओला दोन लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
डान्स पाहून एका यूझरने कमेंट केलीय की डान्स करणारा भाऊ अंडी दिल्यानंतरच शांत बसणार असं दिसतंय. तर दुसऱ्यानं म्हटलंय की या भावाला तोड नाही. एकानंतर या कोंबडीला पोलिओ झालाय का? असं म्हणत खिल्ली उडवली आहे.