माकडाने बिबट्याला असे काही चकवले की तुम्ही म्हणाल....शक्तीपेक्षा युक्तीच श्रेष्ठ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 18:35 IST2021-08-01T18:31:44+5:302021-08-01T18:35:29+5:30

जगण्यासाठी जितका माणसाला संघर्ष करावा लागतो त्याहुनही कैक पटीने अधिक तो संघर्ष प्राण्यांना करावा लागतो. प्राण्यांच्या जगण्यासाठीचा संघर्ष पाहायचा असेल तर जंगलातच जावे लागेल. तिथे अशी काही दृश्ये दिसतील जी पाहुन तुमच्या अंगावर काटा येईल.

monkey vs leopard, monkey saved his life from leopard | माकडाने बिबट्याला असे काही चकवले की तुम्ही म्हणाल....शक्तीपेक्षा युक्तीच श्रेष्ठ!

माकडाने बिबट्याला असे काही चकवले की तुम्ही म्हणाल....शक्तीपेक्षा युक्तीच श्रेष्ठ!

जगण्यासाठी जितका माणसाला संघर्ष करावा लागतो त्याहुनही कैक पटीने अधिक तो संघर्ष प्राण्यांना करावा लागतो. प्राण्यांच्या जगण्यासाठीचा संघर्ष पाहायचा असेल तर जंगलातच जावे लागेल. तिथे अशी काही दृश्ये दिसतील जी पाहुन तुमच्या अंगावर काटा येईल. सोशल मिडियावर व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून तुम्ही या संघर्षाची क्षणचित्रे पाहु शकता. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होतोय. यात दोन प्राणी आपल्या जगण्यासाठी जीवाचा आकांत करतायत.

आयएफएस सुसांता नंदा यांनी ही क्लीप ट्वीटरवर ट्वीट केलीय. यात माकड आणि बिबट्याची झटापट आपण पाहु शकतो. माकड आणि बिबट्या दोघेही एकाच झाडावर आहेत. बिबट्या माकडाला पकडण्यासाठी त्याच्या मागे झाडावर उड्या मारतोय. मात्र इथे आपण पाहु शकतो की शक्तीपेक्षा युक्ती किती महान असते ते. माकड त्या बिबट्याला झाडावर इकडून तिकडून उड्या मारत चकवतंय. जेव्हा बिबट्या माकडाला पकडण्यासाठी एका बाजूला उडी मारतो तर माकड लगेचच दुसरीकडे उड्या मारतं. दोघेही जीवनासाठी संघर्ष करतायत. एकजण पोट भरण्यासाठी आणि दुसरा आपली शिकार होण्यापासून वाचवण्यासाठी. 

दोघांचा हा संघर्ष सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दोघांच्या या झटापटीत शेवटी नेमकं कोणं जिंकतं याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकल असेल?

Web Title: monkey vs leopard, monkey saved his life from leopard