शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

माकडचेष्टा नव्हे! खरोखरचा मेकअप करतायत की माकडं, लोक म्हणाले दिवाळीची तयारी सुरु झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 14:09 IST

जंगलात शूट केला गेलेला हा दोन माकडांचा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माकड आपल्या साथीदाराच्या भुवया व्यवस्थित करत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल की माणसात आणि माकडात काय समानता आहे.

माकडांना माणसाचे पूर्वज म्हटलं जातं. माकडेही अनेकदा माणसांप्रमाणे हरकती करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर (Viral Video of Monkey) आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल की माणसात आणि माकडात काय समानता आहे.

व्हिडिओमध्ये दोन माकडं एकमेकांच्या शेजारी बसल्याचं दिसतं. यातील एक माकड अतिशय प्रेमाने आपल्या दुसऱ्या साथीदाराचे डोळे साफ करताना दिसतं. जंगलात शूट केला गेलेला हा दोन माकडांचा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माकड आपल्या साथीदाराच्या भुवया व्यवस्थित करत आहे. सुरुवातीला ते आपल्या जोडीराचे डोळे साफ करताना दिसतं. नंतर ते त्याच्या भुवया (Eyebrows) व्यवस्थित करतानाही दिसतं.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) आयएफएस सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन (Twitter Account) शेअर केला आहे. या व्हिडिओ कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, भुवया आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थित करताना. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ ३८ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यासोबतच अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

या व्हिडिओवर यूजर्स मजेशीर आणि वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरचं असं म्हणणं आहे, की यांनी तर ब्यूटिशियनलाही मागे सोडलं. हा व्हिडिओ उदाहरण आहे, की माकड माणसाप्रमाणेच हुशार आहे, सोबतच त्याला आयुर्वेदीक पद्धतीनं साफसफाई आणि उपचार करण्याच्या पद्धतीही माहिती आहेत. हा नैसर्गिक उपचार आहे. त्यांना जेव्हा एखाद्या गोष्टीची आवश्यकता असते, तेव्हा ते जंगलातूनच शोधून काढतात. दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं, की तुम्ही माकडांना पाहून कधीच बोर होणार नाही. आणखी एकानं कमेंट करत म्हटलं की हे सलूनप्रमाणे दिसत आहे. ज्यात एक माकड दुसऱ्याला म्हणत आहे की मी तुझं स्टायलिंग करतो आणि तू माझं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरMonkeyमाकड