पॅरिस येथे झालेल्या फॅशन वीकमध्ये कपडे आणि सौंदर्याचा तडका नेहमीच बघायला मिळतो. पण यावेळी मात्र असं काही घडलं की, लोकांना हसू फुटलं. एका पुरूष मॉडेलने इतक्या तावातावात कॅटवॉक केला की, लोकांना हसू आवरता आलं नाही. सोशल मीडियात मॉडलच्या रॅम्प वॉकचा फोटो व्हायरल झाला आहे.

या मॉडलचा रॅम्प वॉक इतका भन्नाट आहे की, प्रसिद्ध फॅशन मॅगझिन 'यूएस वोग'चे एडीटर इन चीफ अन्ना विंटोर सुद्धा हसल्या. अन्ना सामान्यपणे आपल्या गंभीर अंदाजासाठी चर्चेत राहतात. अशात त्यांना हसवणं फॅशनच्या विश्वात मोठी गोष्ट मानली जात आहे.

कोण आहे हा मॉडेल?

रॅम्प वॉक करणाऱ्या मॉडेलचं नाव लियोन डेम आहे. तो जर्मनीचा असून Maison Margiela Spring 2020 शोसाठी फॅशन वीकमध्ये कॅटवॉक करत होता. सोशल मीडियात त्याच्या अनोख्या चालण्यामुळे अनेकांच्या ओठांवर हसू फुटलं आहे. त्याच्या कपड्यांपेक्षा त्याच्या अंदाजाची चर्चा अधिक होत आहे.

लियोन याने स्वत: या रॅम्प वॉकचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यूट्यूबवरही याबाबत एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. सामान्यपणे मॉडल्स कॅट वॉक करताना एकतर 'स्टोन फेस' हावभाव देतात नाही तर स्माइल देतात. पण लियोन असा काही चालत होता की, जणू तो कुणाशीतरी भांडून आला आहे.


Web Title: Models intense ramp walk was so funny that everyone smiled video goes viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.