VIDEO: गर्लफ्रेंड बेवफा निघाली; बॉयफ्रेंडनं तिच्या घराजवळून वाजत-गाजत वरातच काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 10:13 IST2021-11-14T09:01:19+5:302021-11-14T10:13:54+5:30

वरातीमध्ये गाड्यांचा ताफा; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

men took revenge from bewafa girlfriend in unique way video viral | VIDEO: गर्लफ्रेंड बेवफा निघाली; बॉयफ्रेंडनं तिच्या घराजवळून वाजत-गाजत वरातच काढली

VIDEO: गर्लफ्रेंड बेवफा निघाली; बॉयफ्रेंडनं तिच्या घराजवळून वाजत-गाजत वरातच काढली

सध्या देशात लग्नाचा हंगाम सुरू आहे. देशभरात हजारो विवाह सोहळे आहेत. अनेकांची घरी त्यासाठीची तयारी सुरू आहे. लग्न म्हटलं की वरात आली. लग्नाच्या मोसमात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ मजेदार असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फेसबुकपासून इंस्टाग्रामपर्यंत व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक वरात दिसत आहे. या वरातीमध्ये गाड्यांचा ताफा आहे. कारमध्ये वराती असून ते 'बेवफा निकली है तू' गाण्यावर नाचत आहेत. मुलाच्या मित्रांनी गाण्यावर जोरदार ठेका धरला आहे. प्रियकरानं प्रेयसीच्या घराबाहेरुन ही वरात काढल्याचं सांगण्यात येत आहे.

लग्नास नकार देणाऱ्या, साथ सोडून जाणाऱ्या प्रेयसीसाठी प्रियकरानं ही वरात काढण्यात आल्याचं समजतं. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही. हा व्हिडीओ आधीही व्हायरल झाला होता. लग्नाचा हंगाम आल्यावर हा व्हिडीओ व्हायरल होतो. या व्हिडीओवर अनेक गमतीशीर कमेंट येत आहेत.

Web Title: men took revenge from bewafa girlfriend in unique way video viral