शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Avengers Endgame पाहण्यापूर्वीच बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डला घातल्या अजबगजब अटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 16:37 IST

मार्वल्स फॅन्स गेल्या कित्येक दिवसांपासून Avengers Endgame या सिनेमाची वाट बघत होते. अखेर हा सिनेमा २६ एप्रिलला रिलीज झाला.

मार्वल्स फॅन्स गेल्या कित्येक दिवसांपासून Avengers Endgame या सिनेमाची वाट बघत होते. अखेर हा सिनेमा २६ एप्रिलला रिलीज झाला. पण फॅन्स तर फॅन्स असतात, त्यांचं काही केलं जाऊ शकत नाही. असाच एक फॅन आहे Cyrille, हा नुसता फॅन नाही तर डायहार्ड फॅन आहे. इतका की, त्याने त्याच्या गर्लफ्रेन्डसमोर अजब अटी ठेवल्या आहेत. त्याही सिनेमा बघण्यापूर्वी. खरंतर या अटी वाचल्यावर कोणतीही गर्लफ्रेन्ड सामान्यपणे ब्रेकअपचं करेल आणि असंही म्हणेल की, जा एकटाच बघून ये तू सिनेमा.....मोठा आला Avengers चा फॅन वॅन.....

Kamilla Rose ने ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. Cyrille हा तिचा बॉयफ्रेन्ड आहे. त्याने त्याच्या अटींमध्ये सांगितले आहे की, ती सिनेमा सुरु असताना काही खाऊ शकत नाही. साधं पॉपकॉर्नही नाही. इतकेच काय पॉपकॉर्नच्या लाइनमध्येही उभं रहायचं नाही. त्याहून कहर म्हणजे सिनेमा सुरु असताना वॉशरुमला पण जायचं नाही. तेही सिनेमाचे एंडिंग क्रेडिट्स पूर्ण संपेपर्यंत. ती केवळ काही आपात्कालीन स्थिती असेल तर मुलाला भेटण्यासाठी ती सिनेमा मधेच सोडण्याची रिस्क घेऊ शकते. पण तो जाणार नाही, तो तिला सिनेमा पूर्ण पाहून झाल्यावरच तिला भेटायला जाणार. 

आता सोशल मीडियातील लोक या पोस्टची चांगली मजा घेत आहेत. Avengers चे फॅन्स असेच असतात. काही लोकांनी तर ते सिंगल असल्यावरुन आनंद व्यक्त केला. 

ही पोस्ट पाहून काही लोकांना या महिलेच्या बॉयफ्रेन्डचं कौतुक वाटलं तर काही लोकांना ते सिंगल असल्याचा आनंद झाला. पण काहीही असो फॅन्स असतात फारच मजेदार.

टॅग्स :Avengers Endgameअ‍ॅवेंजर्स- एंडगेमSocial Viralसोशल व्हायरल