'या' ९ वर्षाच्या मुलीची फॅशन विश्वात रंगली चर्चा, का ते फोटो पाहूनच कळेल....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 15:20 IST2019-09-30T15:14:55+5:302019-09-30T15:20:45+5:30
सध्या फॅशन विश्वात या मुलीची चर्चा रंगली असून या मुलीचं नाव आहे डेसीमे दिमेत्रे. १८ महिन्यांची असताना तिच्या दोन्ही पायांना इन्फेक्शन झालं होतं.

'या' ९ वर्षाच्या मुलीची फॅशन विश्वात रंगली चर्चा, का ते फोटो पाहूनच कळेल....
(Image Credit : milenio.co)
सध्या फॅशन विश्वात या मुलीची चर्चा रंगली असून या मुलीचं नाव आहे डेसीमे दिमेत्रे. १८ महिन्यांची असताना तिच्या दोन्ही पायांना इन्फेक्शन झालं होतं. त्यानंतर गुडघ्याखालचे भाग कापण्यात आले होते. आता ती पहिली अशी मॉडल आहे, जिने Double Amputee असूनही पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक केला.
डेसीच्या वडिलांचं नाव एलेक्स आहे. ते सांगतात की, 'आज जर तिचे पाय असते, तर कदाचित तिचं जगणं वेगळं असलं असतं. पण नसती, जशी आता आहे. ती आता जे करत आहे, ते तेव्हा करू शकली नसती'.
डेसीने स्वत:ला स्वत: तयार केलंय. आधी ती चालायला शिकली. नंतर जंप शिकली. आता तर ती वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट देखील करते.
डेसीचं हे फोटोशूट व्हायरल झालं होतं. लोकांना तिचा बिनधास्तपणा आणि तिची हिंमत पसंत पडली होती.
प्राइड ऑफ बर्मिंघम अवॉर्ड्समध्ये डेसीला Child Of Courage ने सन्मानित करण्यात आलं.
डेसीला अशआप्रकारे बघून अनेकांना प्रेरणा मिळते. हिंमत मिळते. डेसीकडे पाय नाहीत, पण ती स्वत:ला कधी निराश होऊ देत नाही.