'आभासी प्रेयसी' सोबत डेटिंग; भविष्य, भावनिक अन् सेक्सवर करते चॅट, लोक करताय वेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 17:35 IST2023-05-17T17:31:24+5:302023-05-17T17:35:01+5:30
कॅरीन मार्जोरी (२३) हिचे स्नॅपचॅटवर १८ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत.

'आभासी प्रेयसी' सोबत डेटिंग; भविष्य, भावनिक अन् सेक्सवर करते चॅट, लोक करताय वेटिंग
जगभरात अनेक लोक पैसे कमावण्यासाठी विविध मार्ग अवलंबतात. हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) क्रेझ सतत वाढतेय, हे ओळखून जॉर्जियाच्या तरुणीने हुबेहूब तिच्याप्रमाणेच वागणारा, संवाद साधणारा अन् त्याद्वारे ती रग्गड कमाई करतेय. एआय बॉट तयार केला अन् त्याद्वारे ती रग्गड कमाई करतेय.
कॅरीन मार्जोरी (२३) हिचे स्नॅपचॅटवर १८ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. प्रत्येकाला वेळ देणे शक्य नाही, त्यामुळे लाखो चाहत्यांसोबत वेळ घालवण्यासाठी ती कॅरीनएआयचा वापर करतेय. भविष्यातील योजना, भावनिक गप्पा अन् अगदी सेक्सवरही ती चॅट करते. मार्जोरीचा हा आभासी अवतार हजारो तासांच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बनला आहे. लोकांची एआय गर्लफ्रेंड बनण्यासाठी ती एका मिनिटाला एक डॉलर (सुमारे ८० रुपये) आकारते.
एआय क्लोनद्वारे ती एकाचवेळी १००० लोकांना डेट करत आहे. या आभासी गर्लफ्रेंडची डिमांड इतकी आहे की, २ मे रोजी लाँच झाल्यापासून ५००० लोकांनी तिच्यासोबत डेटसाठी साइन अप केले. ७१ हजार ६१० डॉलरची कमाई केली आहे. डेटिंगची वेटिंग २६ तासांवर गेली आहे. एकाकी लोकांसाठी क्लोन बनवला असून जर २० हजार लोकांनी साइन अप केले तरी १ महिन्यात ५ दशलक्ष डॉलरची कमाई करू शकते, असे ती म्हणते.