सोशल मिडियावर धुमाकुळ घालतेय 'या' युवकाची कथा, असं काय केलंय त्यानं? पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 17:18 IST2021-07-29T17:17:19+5:302021-07-29T17:18:16+5:30

सध्या बशीर मीर नावाचा युवक सोशल मिडियावर भलातच ट्रेंडिंग आहे. या युवकानं अशी कामगिरी केलीय की लोक त्याचं कौतुक करता करता थांबत नाहीयेत. त्याच्या धैर्यानं त्यांना भल्याभल्यांना लाजवेल असं काम केलंय. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की हा बशीर मीर नेमका आहे तरी कोण?

meet bashir mir a young man who saved life of three boys stuck in flooded sindhu river in kashmir | सोशल मिडियावर धुमाकुळ घालतेय 'या' युवकाची कथा, असं काय केलंय त्यानं? पाहा व्हिडिओ

सोशल मिडियावर धुमाकुळ घालतेय 'या' युवकाची कथा, असं काय केलंय त्यानं? पाहा व्हिडिओ

सध्या बशीर मीर नावाचा युवक सोशल मिडियावर भलातच ट्रेंडिंग आहे. या युवकानं अशी कामगिरी केलीय की लोक त्याचं कौतुक करता करता थांबत नाहीयेत. त्याच्या धैर्यानं त्यांना भल्याभल्यांना लाजवेल असं काम केलंय. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की हा बशीर मीर नेमका आहे तरी कोण?

सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात तीन युवक नदीच्या मधोमध अडकलेले दिसत आहेत. जोराचा पाऊस पडतोय आणि नदीला पूर आलाय. अशा परिस्थीतीत कुणीही त्यांच्या जीवाची खात्री देऊ शकत नाहीये. ते युवकही भरपूर घाबरलेले आहेत. अशातच एक तरुण नदीत उडी मारतो आणि त्या धोधो वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह कापून सरळ पोहत जातो. तो त्या मुलांकडे पोहोचतो आणि दोरीच्या साह्य्याने त्यांना नदीतल्या त्या पुरातून बाहेर काढतो. हे दृश्य पाहिल्यावर तुमच्याही अंगावर रोमांच उभे राहिले असतील. या व्हिडिओमधला या तीन मुलांना वाचवणारा तरुण बशीर मीरच आहे.

काश्मीरमध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे सिंधु नदीचे पाणी वाढले आहे. एसडीआरएफचे जवान लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवत आहेत. लोकांनी मात्र मीरच्या या धैर्याला कडक सैल्युट ठोकलं आहे.

Web Title: meet bashir mir a young man who saved life of three boys stuck in flooded sindhu river in kashmir