शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

बॉस असावा तर असा! 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी 11 दिवसांची सुट्टी केली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 15:28 IST

सततच्या कामातून काही दिवस सुटका मिळावी अशी प्रत्येक कर्मचाऱ्याची इच्छा असते.

नवी दिल्ली : सततच्या कामातून काही दिवस सुटका मिळावी अशी प्रत्येक कर्मचाऱ्याची इच्छा असते. आपल्या कंपनीच्या बॉसने अचानक 10-12 दिवसांची सुट्टी जाहीर केली तर किती बर होईल असे अनेकांना वाटत असते. मात्र ई-कॉमर्स कंपनी मीशोने आपल्या कर्मचाऱ्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. कर्मचारी आनंदी असतील तर त्यांचे मानसिक आरोग्यही चांगले राहील, असा विश्वास मीशोला आहे. कर्मचारी खुश असतील तर ते अधिक मेहनत करतील. त्यामुळे कंपनीने 11 दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी कंपनीने सलग दुसऱ्या वर्षी 11 दिवसांसाठी 'रीसेट ंड रिचार्ज ब्रेक'ची घोषणा केली आहे. मीशोने आपल्या वेबसाइटवरून याबाबत माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा दूर करणे हा या सुट्यांमागील कंपनीचा उद्देश असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या काळानंतर कंपनी कर्मचाऱ्यांना या सुट्ट्या देणार आहे. सणासुदीनंतर म्हणजेच 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत या सुट्ट्या देण्यात येणार आहेत.

'रीसेट ंड रिचार्ज ब्रेक'साठी ब्रेककंपनीचे संस्थापक संजीव बर्नवाल यांनी ट्विटवरून घोषणा करताना म्हटले, "आमचे प्रमुख उद्दिष्ट आमच्या कर्मचाऱ्यांना मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवणे आहे. सलग दुसऱ्या वर्षी आम्ही कर्मचाऱ्यांसाठी 11 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. आगामी काळात येणाऱ्या सणांनंतर, मीशोचे कर्मचारी 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या सुट्ट्यांचा उपयोग त्यांचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी करू शकतील. कर्मचारी या सुट्ट्यांचा उपयोग आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी किंवा कुठेतरी प्रवास करण्यासाठी करू शकतात."

मीशो कंपनीचे संस्थापक आणि सीईओ विदित आत्रे यांनी देखील याबाबत ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अंतराळवीरांनाही विश्रांतीची गरज असते आणि कंपनीत 'मूनशॉट मिशन'वर काम करणाऱ्या लोकांनाही याची गरज असते. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलEmployeeकर्मचारीMental Health Tipsमानसिक आरोग्य