Viral Photo : कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यातील एका मंदिरातील एक अशी घटना समोर आली, जी वाचून सगळेच अचंबित झाले आहेत. येथील देवीच्या मंदिरातील दानपेटीमध्ये एक अशी नोट सापडली ज्यावर एका महिलेनं 'सासू लवकर मरावी' असे देवीकडे मागणे मागितले. नोटवर लिहिलेली ही मागणी वाचून मंदिर व्यवस्थापन अवाक् झालं. आता या नोटेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कलबुर्गी जिल्ह्याच्या अफजलपूर तालुक्यातील कातादरगी भागात भाग्यवंती मंदिरातील दानपेटी भरली होती. त्यानंतर व्यवस्थापनानं दानपेटी उघडली आणि पैशांची मोजणी सुरू केली. त्यावेळी दानपेटीत २० रूपयाची एक नोट सापडली. नोटेवर हिंदीत लिहिलं होतं की, 'माँ, मेरी सास जल्द ही मर जाये।'
सामान्यपणे जेव्हा एखाद्या मंदिराची दानपेटी उघडली जाते, तेव्हा मंदिराला मिळालेल्या दानाची रक्कम किंवा वस्तूची माहिती देणं एक लोकप्रिय रिवाज आहे. पण या मंदिरात जमा झालेल्या दानाच्या रक्कमेऐवजी ही २० रूपयांची नोट चर्चेचा विषय बनली आहे. देवीकडे एका महिलेनं देवीकडे केलेली ही मागणी वाचून सगळेच अवाक् झालेत.
दान पेटीतून आणखी काय निघालं?
मंदिराच्या दानपेटीतून ६० लाख रूपये रोख, १ किलो चांदी आणि २०० तोळ्याचे सोन्याचे दागिने मिळाले. पण २० रूपयांच्या नोटेवर जे लिहिलं होतं त्याच विषयाकडे सर्वांचं लक्ष होतं. सामान्यपणे देवाकडे परिवाराच्या सुखासाठी मनोकामना केली जाते. पण एका महिलेने देवाकडे सासूच्या मरणाची मागणी केली.