शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Manoj Tiwari: 'हर घर तिरंगा' रॅलीमध्ये मनोज तिवारींनी तोडले ४ नियम; कापले ४१ हजारांचे चलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 12:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशातील विविध भागांमध्ये 'हर घर तिरंगा' रॅलीचे आयोजन केले जात आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाहनानंतर देशातील विविध भागांमध्ये 'हर घर तिरंगा' रॅलीचे आयोजन केले जात आहे. दरम्यान भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी देखील मोटारसायकल रॅली काढून या अभियानात सहभाग घेतला. मात्र वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी त्यांना तब्बल ४१ हजारांचा दंड भरावा लागणार आहे. या मोटारसायकल रॅलीमध्ये त्यांनी हेल्मेट वापरले नव्हते, एवढेच नाही तर त्यांच्याकडे मोटारसायकल चालवण्याचा परवाना देखील नव्हता. मोटारसायकचे प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) आणि मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्यामुळे त्यांना एवढा दंड आकारला गेला. वाहतुक नियमांची पायमल्ली केली म्हणून दिल्ली पोलिसांनी त्यांना एवढा दंड आकारला आणि सर्वांचेच लक्ष वेधले. 

४१ हजारांचे कापले चलन हेल्मेट न वापरल्यामुळे १ हजार रूपये, पीयुसी सर्टिफिकेट नसल्यामुळे १० हजार रूपये, विना परवाना मोटारसायकल चालवली म्हणून ५ हजार रूपये याशिवाय नंबर प्लेट नसताना गाडी चालवली म्हणून ५ हजार रूपये आणि मोटारसायकलच्या मालकावर २० हजार रूपयांचा दंड लावण्यात आला आहे. एकूणच मनोज तिवारी यांच्या कडून ४१ हजार रुपयांचे चलन कापण्यात आले आहे. 

मनोज तिवारी यांनी आपली चूक झाली असल्याचे मान्य केले असून माफी मागितली आहे. "आज हेल्मेट न वापरल्यामुळे क्षमस्व. मी चलनाची रक्कम भरेन. आपल्या सर्वांना आवाहन करतो की हेल्मेट वापरल्याशिवाय दुचाकी वाहने चालवू नका. तुमच्या मित्रांना आणि घरच्यांना तुमची गरज आहे", असे ट्विट करत खासदार महोदयांनी आपली चुकीवर स्पष्टीकरण दिले. 

विविध भागात बाइक रॅलीचे आयोजनदेश स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. 'आजादी का अमृत महोत्सव' या अंतर्गत एका तिरंगा बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये केंद्रीय मंत्र्यांसोबत काही तरूण खासदारांनी सहभाग नोंदवला होता. लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे हा यामागील उद्देश आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. तसेच २ ऑगस्टपासून सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटोला तिरंगा लावण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdelhiदिल्लीtraffic policeवाहतूक पोलीसBJPभाजपाMember of parliamentखासदारministerमंत्री