अबब! ८.५ फूट लांब माशाची किंमत वाचून जागेवरून उडालच...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 03:35 PM2019-09-28T15:35:23+5:302019-09-28T15:50:01+5:30

समुद्रात नेहमीच वेगवेगळे आणि आकाराने मोठे मासे आढळल्याच्या बातम्या समोर येत असतात. काहींची चर्चा किंमतीमुळे होते तर काहींची आकाराने.

Man Who Caught a Fish Worth 23 Crore Rupees, Released It Back Into the Sea | अबब! ८.५ फूट लांब माशाची किंमत वाचून जागेवरून उडालच...

अबब! ८.५ फूट लांब माशाची किंमत वाचून जागेवरून उडालच...

Next

समुद्रात नेहमीच वेगवेगळे आणि आकाराने मोठे मासे आढळल्याच्या बातम्या समोर येत असतात. काहींची चर्चा किंमतीमुळे होते तर काहींची आकाराने. असाच एका मासा चर्चेत आला असून आयर्लंडच्या समुद्रात एका टुना मासा आढळला. आता तुम्ही म्हणाल याची चर्चा का रंगली? तर हा आतापर्यंत आढळलेल्या माशांपैकी सर्वात मोठा टुना मासा आहे. आणि त्यामुळे अर्थातच याची किंमतही अधिक असणार.

news18.com ने दिलेल्या वृत्तानुसार, आयर्लंडच्या समुद्रात एका व्यक्तीला हा टुना मासा सापडला, मात्र त्यानं लगेचच हा मासा पाण्यात सोडून दिला. वेस्ट कॉर्क चार्टड कंपनीचे डेव्ह अडवर्डला समुद्रात ८.५ फूट लांब ब्लुफिन टुना (Bluefin Tuna) मासा सापडला. टुना मासा हा जपानमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. त्यामुळे त्याला इथे नेहमीच मोठी किंमत मिळते. त्यानुसार या माशाची किंमत अंदाजे २३ कोटी सांगण्यात आली. 

आयरिश मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, अलिकडे सापडलेला हा सर्वात मोठा मासा आहे. Atlantic bluefin tuna या माशाला जपानमध्ये ३ मिलियन युरो म्हणजे जवळजवळ २३ कोटींपेक्षा जास्त किंमत आहे. डेव्ह अडवर्ड आणि त्यांच्या टीमनं, मासा पकडल्यावर त्याचं वजन करण्यात आलं. त्यानंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आलं. डेव्ह यांनी पकडलेल्या माशाचे वजन जवळजवळ २७० किलो होते. सध्या या माशाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Web Title: Man Who Caught a Fish Worth 23 Crore Rupees, Released It Back Into the Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.