ती म्हणाली उंची ओळखा! पठ्ठ्यानं त्रिकोणमितीनं 'करेक्ट' कार्यक्रमच केला, शेवटी 'मेन विल बी मेन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 15:43 IST2023-03-03T15:40:23+5:302023-03-03T15:43:08+5:30
पठ्ठ्य़ानं एका फोटोतील महिलेची उंची मोजण्यासाठी त्रिकोणमितीचा वापर केला आणि उत्तरही दिलं.

ती म्हणाली उंची ओळखा! पठ्ठ्यानं त्रिकोणमितीनं 'करेक्ट' कार्यक्रमच केला, शेवटी 'मेन विल बी मेन'
आपण शाळेत शिकलेले धडे आणि विशेषतः गणित हे दैनंदिन जीवनात मात्र उपयोगी पडत नाही अशी तक्रार केली जाते. पुस्तकी अभ्यासापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञानावर भर दिलेला चांगला. जेणेकरुन अनुभवानं गोष्टी शिकता येतात. पण एका पठ्ठ्यानं पुस्तकी शिक्षणही किती उपयोगी ठरू शकतं याचं हटके उदाहरण दिलं आहे. त्यानं चक्क एका फोटोतील महिलेची उंची मोजण्यासाठी त्रिकोणमितीचा वापर केला आणि उत्तरही दिलं.
guess my height! pic.twitter.com/kNkaBn7d2q
— Pallavi Pandey (@pallavipandeyy) February 27, 2023
पल्लवी पांडे या ट्विटर यूझरनं मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटवर स्वत:चा एक फोटो अपलोड केल्यानंतर हा सगळा प्रकार घडला आहे. पल्लवी हिनं स्वत:चा फोटो पोस्ट करत तिची उंची मोजण्याचं आव्हान यूझर्सना दिलं. मग काय काही तासांतच यूझर्सनं वेगवेगळे अंदाज लावण्यास सुरुवात केली. तर एका पठ्ठ्यानं थेट त्रिकोणमितीचा वापर करत उंचीचं गणित केलं. बरं त्यानं पल्लवीच्या उंचीचं गणित मांडून दाखवलं असलं तरी त्याच्या विचारांची उंची नेटिझन्सना चांगलीच भावलेली दिसत आहे. कारण त्यानं पल्लवीच्या फोटोवर केलेली आकडेमोड इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.
Looks like 5' 4.5"
— Mr. Nobody (@mister_nobody__) February 27, 2023
But now I am curious. pic.twitter.com/tcMQCEWRqy
'मिस्टर नोबडी' नावाच्या ट्विटर हँडलवरुन पल्लवी पांडे हिच्या उंची मोजण्याच्या आव्हानाला उत्तर देण्यात आलं. यूझरनं पल्लवीच्या फोटोवरच त्रिकोणमितीची आकडेमोड केली आणि पल्लवीची उंची ५ फूट साडेचार इंच असल्याचं उत्तर दिलं. उंचीचा अंदाज लावण्यासाठी एवढी मेहनत घेतल्याचे बघून पल्लवीनंही, "मी खूप उंच आहे. पण तुझ्या प्रयत्नांना सलाम, व्वा!" अशी प्रतिक्रिया दिली आहे. उंची मोजण्यासाठी त्रिकोणमितीचा वापर केल्याचे बघून अनेक नेटकरीही अवाक् झाले आहेत.