शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सापाला वारंवार डिवचत होता, सापाने असा काही चावा घेतला की मरता मरता वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 15:33 IST

एक व्यक्ती सापाचं लक्ष विचलित करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र, यानंतर जे काही घडलं ते पाहून सगळेच घाबरले. 

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Videos) होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक यूजर्स हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ एका सापाचा (Snake Video) आहे, यात एक व्यक्ती सापाचं लक्ष विचलित करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र, यानंतर जे काही घडलं ते पाहून सगळेच घाबरले. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतं, की एक काळा साप जमिनीवरुन चालला आहे. इतक्यात एक व्यक्ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान सुरुवातीला साप त्याच्यापासून वाचून पळण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हा व्यक्ती वारंवार सापाला हात लावत असल्याने आणि पकडण्याचा प्रयत्न करत असल्याने साप त्याला चावतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सापाने चावल्यानंतर या व्यक्तीच्या बोटांमधून रक्त येऊ लागतं. हा व्यक्तीदेखील वारंवार कॅमेऱ्यात हे रक्त दाखवू लागतो.

काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर royal_pythons_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरनं याला कॅप्शन देत लिहिलं, 'फ्लोरिडाचा सर्वात मोठा वाटर स्नेक आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला आहे. साप सहसा भरपूर रागीट असतात मात्र ते हल्ला करण्याऐवजी आपला जीव वाचवून पळण्याला अधिक प्राधान्य देतात. परंतु सापांच्या काही प्रजाती अशाही असतात ज्यांना वारंवार त्रास दिल्यास ते मागे वळून तुम्हाला चावूही शकतात. यामुळे या जीवाला त्रास न देण्यातच भलं आहे'. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

इन्स्टाग्रामवर शेअर झाल्यापासून आतापर्यंत १८ हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं यावर कमेंट करत लिहिलं, या व्यक्ती सापाला पकडलंच का, तेही दोन वेळा. दुसऱ्या एकानं कमेंट करत लिहिलं, वाटर मोकासिन विषारी असतात. फ्लोरिडामध्ये हे साप भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाsnakeसापInstagramइन्स्टाग्राम