शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: सिंहासोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात होता माणूस, सेल्फी राहिला बाजूला पुढे घडलं धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:55 IST

सिंह समोर आला की हृदयाचे ठोके वाढतात. सिंह दिसला म्हणून कुणीही त्याच्या अगदी जवळ जाणार नाही. पण एका व्यक्तीने अशी नको ती डेअरिंग केली. त्याने चक्क सिंहासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.

 (Lions video) पाहायला कुणाला आवडणार नाही. त्यासाठी आपण जंगल सफारी, नॅशनल पार्कमध्ये जातो. पण सिंह तो सिंह... जो जंगलाचा राजा. कितीही पाहावासा वाटला तरी त्याला पाहताच आपल्याला धडकी भरतेच. सिंह समोर आला की हृदयाचे ठोके वाढतात. सिंह दिसला म्हणून कुणीही त्याच्या अगदी जवळ जाणार नाही. पण एका व्यक्तीने अशी नको ती डेअरिंग केली. त्याने चक्क सिंहासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला (Man taking selfie with lions).

जंगल सफारी, नॅशनल पार्कमध्ये गेल्यावर सिंह दिसताच आपल्या हातात कॅमेरे येतात आणि आपण त्या सिंहाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करतो. सिंहाचा फोटो, व्हिडीओ काढणं ठिक आहे पण सिंहासोबत सेल्फी काढण्याचा विचार आपण स्वप्नातही करणार नाही. एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो तिथं माकड, हत्ती असे प्राणी दिसलं की सेल्फी काढण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. पण सिंहासोबत सेल्फी नको रे बाबा. सेल्फीपेक्षा आपला जीव बरा. या सेल्फीच्या नादात आपला जीव जायला नको असंच आपण म्हणून. पण हा तरुण मात्र भलताच डेअरिंगबाज निघाला.

व्हिडीओत पाहू शकता दोन भलमोठे सिंह दिसत आहे. एक सिंह झाडाच्या खोडावर आणि एक जमिनीवर उभा आहे. या दोन्ही सिंहांच्या समोर हा तरुण छाती ताणून उभा राहतो. तो सिंहांच्या इतक्या जवळ आहे की पाहून आपल्या अंगावर काटा येतो. तरुण सिंहांच्या पुढे उभा राहून सेल्फी काढताना दिसतो. मागे उभे असलेले सिंह त्याच्याकडे पाहत असतात. सेल्फीसाठी या तरुणाने आपला जीवच धोक्यात टाकला आहे. सुदैवाने या व्हिडीओत तरी सिंह या तरुणावर हल्ला करताना दिसत नाही आहेत आणि देव न करो तसं काही झालं असावं.

हा व्हिडीओ पाहूनच सर्वजण हैराण झाले आहेत. या तरुणाने जो मूर्खपणा केला तसा तुम्ही बिलकुल करू नका. सेल्फीपेक्षा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे अशा हिंस्र प्राण्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यापर्यंत ठिक पण स्वतःला त्यांच्यासोबत कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न मात्र बिलकुल करू नका.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम