लोकलच्या लगेज रॅकवर आडवा होऊन झोप काढतोय; भन्नाट जुगाड करणारा 'तो' आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 10:53 IST2022-04-20T10:52:43+5:302022-04-20T10:53:01+5:30
जुगाडू व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

लोकलच्या लगेज रॅकवर आडवा होऊन झोप काढतोय; भन्नाट जुगाड करणारा 'तो' आहे तरी कोण?
मुंबई: मुंबई आणि मुंबईकर कधीही झोपत नाही असं म्हणतात. अगदी मध्यरात्री, पहाटेच्या सुमारासही काही मुंबईकर पोटापाण्यासाठी काम करत असतात. दूधविक्रेते, वृत्तपत्रविक्रेत्यांचा दिवस इतरांपेक्षा आधीच सुरू होतो. मात्र आराम कुठे करायचा आणि कसा करायचा हेदेखील मुंबईकरांना चांगलं माहीत आहे. टाईम मॅनेजमेंट करण्यात मुंबईकर चांगलेच हुशार आहेत. मुंबई लोकलमधल्या एका फोटोमुळे त्याची प्रचिती आली आहे.
गर्दीच्या वेळी मुंबई लोकलमध्ये चढणं तसं जिकरीचं काम. अशा वेळी चौथी सीट मिळाली तरी खूप झालं. या परिस्थितीत कोणी छान आडवं होऊन झोप काढत असेल तर? कदाचित तुम्हाला हे अशक्य वाटेल. पण असं घडलंय. लोकलमध्ये एक व्यक्ती मस्त आडवी होऊन झोप पूर्ण करत आहे. सोशल मीडियावर या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या फोटोत एक जीन्स आणि टी शर्ट घातलेली व्यक्ती सामान ठेवण्याच्या रेकवर आडवी झाल्याचं दिसत आहे. या व्यक्तीच्या डोळ्यांवर एक कापड दिसतंय. लोकलमधील ट्युबलाईट्सचा प्रकाश डोळ्यांवर पडू नये यासाठी व्यक्तीनं काळजी घेतलेली दिसतेय. सहप्रवाशानं या व्यक्तीचा फोटो काढला. तो रेडिटवर शेअर केला. त्यावर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स सुरू झाल्या. त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला.