शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

'अच्छा तो हम चलतें हैं'... डबल डेकर सायकलवर आजोबांचे हेवी रायडिंग, video पाहून नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 13:07 IST

मुंबईसारख्या शहरात किंवा इतर ठिकाणी तुम्ही डबल डेकर बस पाहिली असेलच. अनेकांनी या डबल डेकर बसमधून प्रवासदेखील केला असेल.पण तुम्ही कधी डबल डेकर सायकल पाहिलीय का?

Viral Video : सध्याचे जग हे इंटरनेटवर आधारलेले आहे. या आभासी जगात  सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल  होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वयस्क माणूस चक्क डबल डेकर सायकल चालवताना दिसत आहेत. आजोबांचा अनोखा जुगाड पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही डबल डेकर सायकल नेमकी कशी तयार करण्यात आली, असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडलाय. सामान्य सायकलपेक्षा ही सायकल उंच असूनही आजोबा अगदी सहजतेने सायकल चालवताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, तरीसुद्धा आजोबांचा हा जुगाड अनेकांच्या पसंतीस देखील उतरला आहे. 

नेटकरी काय म्हणाले... 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडियोवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.  अनेकांना ही सायकल बनवण्याची ट्रीक जाणून घेण्याची उत्सुकता आहे. या सायकलमध्ये  अ‍ॅटलसची फ्रेम कापून ती सामान्य सायकलला जोडण्यात आली आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ' हे काका या सायकलवर कसे चढले असतील? रस्त्यावरही ते कोणाच्या आधाराशिवाय चढू शकत नाहीत..', तर दुसऱ्या यूजरने म्हटलंय की , ' बाकी सर्व ठीक आहे, पण आता ते सायकलवरून खाली कसे उतरतील?

येथे पाहा व्हिडिओ:

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर