शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Viral Video: भल्यामोठ्या मगरीशी मस्त खेळतोय हा पठ्ठ्या, व्हिडिओ पाहुन मात्र तुमच्या अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 16:02 IST

सिंहदेखील मगरीसोबत पंगा घेण्याआधी विचार करतो. मात्र सध्या मगरीचा एक असा व्हिडिओ व्हायरल (Crocodile Shocking Video) झाला आहे, जो पाहून लोक हैराण झाले आहेत.

ज्याप्रमाणे सिंहाला 'जंगलाचा राजा' म्हटलं जातं, त्याचप्रमाणे मगरीला 'पाण्याचा राजा' म्हटलं जातं. मगरीच्या बलाढ्य जबड्यात कोणी अडकलं तर त्याचं वाचणं जवळपास अशक्यच होऊन जातं (Crocodile Attack). कारण मगर आपल्या शिकारीला अगदी काही मिनिटात फाडून खाते. यामुळेच सिंहदेखील मगरीसोबत पंगा घेण्याआधी विचार करतो. मात्र सध्या मगरीचा एक असा व्हिडिओ व्हायरल (Crocodile Shocking Video) झाला आहे, जो पाहून लोक हैराण झाले आहेत.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महाकाय मगरीसोबत अगदी आरामात खेळताना दिसत आहे. त्याच्याकडे पाहून असं वाटतं जणू तो मगरीला एक खेळणं समजत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती मगरींनी भरलेल्या हौदात उतरतो. यानंतर तो एका विशालकाय मगरीला उचलून आपल्या मांडीवर घेतो.

हे दृश्य खरोखरच हैराण करणारं आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाचाही थरकाप उडेल. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव क्रिस्टोफर जिलेट असल्याचं सांगितलं जात आहे. तो वाइल्ड लाइफ बायोलॉजिस्ट आणि कन्जर्वेशनिस्ट आहे. क्रिस्टोफर जिलेट आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन सतत मगरींचे नवनवे व्हिडिओ शेअर करत असतो. आता समोर आलेला हा व्हिडिओ धडकी भरवणारा आहे.

मगरीचा हैराण करणारा हा व्हिडिओ discovercrocodiles नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये यूजरने लिहिलं, जिला नावाची ही मगर 136 किलो वजनाची आहे. एक दिवसाआधी अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत साडेसहा हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. हा आकडा वाढतच आहे. तर अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम