जबरदस्त! जादूगाराची जादू पाहून चक्रावून जाल: Video पाहून लोक म्हणतात, हे कसं घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 17:39 IST2023-02-04T17:33:19+5:302023-02-04T17:39:30+5:30
रेस्टॉरंटमध्ये बसलेली एक महिला तिच्या ऑर्डरची वाट पाहत आहे. तेव्हा एक जादूगार तिच्याकडे येतो आणि तिला जादू पाहायला सांगतो.

जबरदस्त! जादूगाराची जादू पाहून चक्रावून जाल: Video पाहून लोक म्हणतात, हे कसं घडलं?
लहान मुले असोत किंवा मोठी माणसं... जादूचा खेळ असा आहे की जो प्रत्येकाला मोठ्या आवडीने पाहायला आवडतो. जादुगार कुठलाही चमत्कार दाखवत नसून तो केवळ हातचलाखी करत असतो. पण तो या सर्व गोष्टी इतक्या वेगाने करतो की, लोकांचे मनोरंजन तर होतेच, पण त्यासोबतच या जादूगाराने हे कसे केले, असा विचार करायलाही लोकांना भाग पाडले जाते. सध्या सोशल मीडियावर असाच काही व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये जादूगाराची जादू पाहून सर्वच अवाक झाले आहेत.
रेस्टॉरंटमध्ये बसलेली एक महिला तिच्या ऑर्डरची वाट पाहत आहे. तेव्हा एक जादूगार तिच्याकडे येतो आणि तिला जादू पाहायला सांगतो. यावर महिलाही तयार होते. पण पुढच्याच क्षणी जादूगार असे काही दाखवतो की ती महिला थोड्या वेळासाठी थक्क होऊन जाते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता, जादूगाराने हे कसे केले यावर महिलेचा विश्वास बसत नाही.
Dinner and a show pic.twitter.com/VlzGFbdHga
— Next Level Skills (@NextSkillslevel) January 30, 2023
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जादूगार टेबलावर पडलेली रिकामी प्लेट आधी एका काळ्या कपड्याने झाकतो. यानंतर कापड काढताच ताटात अन्न येते. आता ते कसे करतो, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या या जादूची तुफान चर्चा रंगली आहे.
ट्विटरवर @NextSkillslevel या हँडलद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये डिनर अँड शो असं लिहिलं आहे. 9 सेकंदाच्या या व्हिडिओमुळे इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगली आहे. व्हायरल क्लिप आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"