शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: पिसाळलेल्या हत्तीसमोर निधड्या छातीने उभा राहीला एकटा तरुण, गावकऱ्यांच्या रक्षणासाठी केली शर्थ अन् मग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 14:05 IST

एका हत्तीचा (Elephant video) एका तरुणाने एकट्याने सामना केला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जंगलाच्या जवळ राहणारे लोक नेहमीच जंगली प्राण्यांच्या दहशतीत असतात. हे प्राणी जंगलातून बाहेर शेतात किंवा रस्त्यांवर येतात. शेतीचं नुकसान करतात, माणसांना हानी पोहोचवतात. या माणसांनाही अशा प्राण्यांचा सामना करण्याची सवय झालेली असते. त्यामुळे बिनधास्तपणे ते अशा प्राण्यांच्या समोर जातात. अशाच एका हत्तीचा (Elephant video) एका तरुणाने एकट्याने सामना केला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ओडिशाच्या रायराखोल वनविभागातील (Rairakhol Forest Divison Odisha) एक व्हिडीओ समोर आला आहे. एका शेतात एक अवाढव्य हत्ती घुसला. हत्तीला हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले. आधी त्यांनी एकत्र हत्तीला पळवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर हत्तीला घाबरून हळूहळू एकेएक करत सर्वांनी काढता पाय घेतला. सर्वजण हत्तीसमोरून दूर झाले. अखेर फक्त एक व्यक्ती या हत्तीसमोर उभी राहिली. (Man fight with elephant)

आपल्यासोबत असणारे इतर लोक मागे हटले हे समजल्यानंतरही ही व्यक्ती घाबरली नाही की तिने आपली जागा जोडली नाही, माघार घेतली नाही. तर उलट हत्तीच्या अगदी समोर उभं राहून, छाती ताणून त्याचा सामना केला. हातात मशाल धरून हत्तीला घाबरवण्याचा प्रयत्न केला.

या व्यक्तीचं नाव चितरंजन आहे. ते राजखोल वनविभागात वनरक्षक आहेत. हत्तीला शेतीचं नुकसान करण्यापासून रोखण्याचं काम त्यांनी केलं. हत्तीला गावापासून दूर जंगलात पळवून लावलं. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सर्वांनी या वनरक्षकाच्या धाडसाचं कौतुक केलं जातं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरforestजंगलforest departmentवनविभाग