Viral Video : आजकाल डोंगरांवर हायकिंग करण्याची क्रेझ तरूणांमध्ये खूप बघायला मिळते. हायकिंग म्हणजे जंगल आणि डोंगरांवर पायी प्रवास करणे. याद्वारे जगाच्या गोंगाटापासून दूर जाऊन मनाला शांतता मिळते. असाच एक अनुभव एका व्यक्तीने शेअर केला. त्याला डोंगरावर फिरत असताना एक रहस्यमय झोपडी आणि त्याच्या आत एक भुयार सापडलं.
इन्स्टाग्राम यूजर जॉशुआ मॅकार्टनी जो एक हायकर आहे आणि आपल्या पाच लाख फॉलोअर्ससाठी अनोखे व्हिडीओ पोस्ट करत असतो. अलिकडे हायकिंग करताना तो एका झोपडीत पोहोचला. आत गेल्यावर त्याला लोंखडी पायऱ्या दिसल्या ज्या खोल भुयारात नेत होत्या. तो पायऱ्याने खाली गेला.
जॉशुआ जसजसा पुढे गेला त्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. आता लोकांच्या राहण्यासाठी व्यवस्था दिसली. भुयाराच्या शेवटी एक चेंबर दिसला. जिथे बाथरूम, काही रूम आणि इतर रिकाम्या जागा दिसल्या. असं वाटतं की, हे ठिकाण सैन्यांसाठी बनवण्यात आलं होतं.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोक आपापल्या अंदाज बांधत आहे. कुणी सांगितलं की, हा एअर रेड बंकर आहे तर काही म्हणाले अणुबॉम्ब हल्ल्यापासून बचावाचं ठिकाण. काही लोकांनी हे सैन्याचं बंकर असल्याचं म्हणाले.
या व्हिडिओला आतापर्यंत २७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक हे ठिकाण पाहून अवाक् झाले आहेत आणि जॉशुआच्या हिंमतीला दाद देत आहेत.