शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

असेही ग्राहक असतात! ३८,००० रुपयांचे बिल बुडवण्यासाठी ग्राहकाने केला घाणेरडा प्रकार; CCTV मुळे सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 19:32 IST

हॉटेलमधील जेवणाचे पैसे चुकवण्यासाठी ग्राहकाने केलेला कांगावा कॅमेऱ्यात कैद

हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिल भरताना टाळाटाळ करण्यासाठी लोक अनेकदा विचित्र कारणे शोधतात. मात्र, ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये एका ग्राहकाने बिल बुडवण्यासाठी जे कृत्य केले, ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आलिशान हॉटेलमध्ये भरपेट जेवण केल्यानंतर अन्नात केस निघाल्याची तक्रार या ग्राहकाने केली, मात्र हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजने याची पोलखोल केली आहे.

सिडनीमधील प्रसिद्ध पोनी डायनिंग या रेस्टॉरंटमध्ये सहा जणांचा एक गट जेवण्यासाठी आला होता. त्यांनी अतिशय महागड्या डिशेस, स्टेक्स आणि ड्रिंक्सची ऑर्डर दिली होती. या सर्वांचे एकूण बिल ६०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (भारतीय चलनानुसार ३८ ते ४० हजार रुपये) झाले होते. जेवण संपत आल्यावर या गटातील एका व्यक्तीने अन्नात केस सापडल्याचा कांगावा केला. अन्नात केस निघाल्यामुळे आम्ही बिल भरणार नाही, असा पवित्रा या संपूर्ण ग्रुपने घेतला आणि बिल न भरताच तेथून निघून गेले.

CCTV फुटेजमध्ये कारस्थान कैद

ग्राहकांच्या संशयास्पद वागणुकीमुळे हॉटेल व्यवस्थापकाने सीसीटीव्ही तपासण्याचे ठरवले. कॅमेरा फुटेज पाहिल्यानंतर हॉटेल कर्मचारी थक्क झाले. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तो ग्राहक अत्यंत सावधपणे आपला हात काखेत नेतो, तेथील केस उपटतो आणि शांतपणे आपल्या ताटातील अन्नात टाकतो. त्यानंतर तो केस सापडल्याचे नाटक करून हॉटेल कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागतो.

हॉटेलने मांडली व्यथा

पोनी डायनिंगने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करत इतर हॉटेल व्यावसायिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. हॉटेलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "आम्ही सहसा असे व्हिडिओ शेअर करत नाही. पण या ग्राहकाने केस निघाल्याची तक्रार करून बिल भरण्यास नकार दिला. हा व्हिडिओ शेअर करण्यामागचा उद्देश फक्त इतर व्यावसायिकांना अशा लोकांपासून सावध करणे हा आहे. आम्ही या प्रकरणाची अधिकृत तक्रार नोंदवली आहे." हॉटेल व्यवस्थापकाने सांगितले की, त्यांनी या ग्राहकांना उत्तम सेवा दिली होती, मात्र त्यांचे वागणे विचित्र वाटल्यामुळे सीसीटीव्ही तपासला आणि हे धक्कादायक वास्तव समोर आले.

सोशल मीडियावर संतापाची लाट

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या ग्राहकावर कडक टीका केली आहे. हा केवळ फसवणुकीचा प्रकार नसून चोरी आहे, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर काहींनी याला विकृती म्हटले आहे. एका हॉटेलमध्ये जाऊन इतक्या महागड्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आणि नंतर अशा घृणास्पद पद्धतीने बिल बुडवायचे, याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Customer's dirty trick to evade bill exposed by CCTV.

Web Summary : An Australian customer tried dodging a $600 restaurant bill by claiming a hair was in the food. CCTV footage revealed he planted it himself. The restaurant shared the video to warn other businesses about such fraudulent behavior.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलhotelहॉटेल