Snake In Train Viral Video : रेल्वेचा प्रवास हा फार आरामदायक, स्वस्त आणि वेळेची बचत करणारा मानला जातो. रेल्वे प्रवासाचे अनेक अनुभव लोक नेहमीच सांगतात असतात. कधी ते चांगले असतात, तर कधी धक्कादायक. अलिकडे रेल्वेत चोरी, लुटमार, भांडणं अशा गोष्टी भरपूर होत असल्याचं अनेकदा बघायला मिळतं. लोकांना धमकावून किंवा त्यांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कदाचित आपण हा व्हिडीओ पाहिला किंवा नसेल, पण आपल्याला सजग करण्यासाठी आम्ही हा व्हिडीओ घेऊन आलो आहोत. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती साबरमती एक्सप्रेसच्या डब्यात हातात जिवंत साप घेऊन फिरताना आणि प्रवाशांकडून पैसे मागताना दिसतो आहे.
अहमदाबाद-साबरमती एक्सप्रेसमधील ही घटना आहे. आप पाहू शकता की, ही व्यक्ती ट्रेनमध्ये साप घेऊन चढली आणि डब्यातील प्रवाशांना घाबरवत पैसे मागू लागली. २२ सेकंदांचा हा व्हिडीओ एक्स यूजर दीपक रघुवंशी यांनी शेअर केला केलाय. ही घटना मध्य प्रदेशातील मुंगावली आणि बीना जंक्शन दरम्यानची आहे.
व्हिडिओमध्ये काय दिसतं?
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कोणतीही सुरक्षितता न ठेवता हातात साप घेऊन डब्यात फिरत आहे. एक प्रवासी त्याला पैसे देतानाही दिसतो, तर इतर प्रवासी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. लोक साप बघून घाबरलेले दिसत आहेत.
रेल्वेचं उत्तर
रघुवंशी यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मध्य प्रदेशातील मुंगावलीमध्ये एक माणूस साप घेऊन ट्रेनमध्ये चढला. हा भारतीय रेल्वेमध्ये गरीब व मेहनती प्रवाशांकडून पैसे घेण्याचा नवा प्रकार आहे."
पाहता पाहता हा व्हिडीओ व्हायरल झाला. अशात रेल्वेला यावर उत्तर देणं भाग पडलं. भारतीय रेल्वेच्या अधिकृत ‘रेलवे सेवा’ अकाउंटवरून यावर रिप्लाय करण्यात आला. त्यांनी उत्तर देताना RPF (रेल्वे सुरक्षा दल) कडून माहिती मागितली की, "आपल्या प्रवासाचा तपशील (PNR नंबर किंवा UTS नंबर) आणि आपला मोबाईल नंबर आम्हाला डायरेक्ट मेसेजद्वारे द्या."
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर थेट मागणी केली की त्या माणसाला तात्काळ अटक केली जावी.
Web Summary : A man with a live snake extorted money from terrified passengers on the Ahmedabad-Sabarmati Express. The incident, filmed between Mungaoli and Bina Junction, prompted outrage. Railway authorities have sought details and are investigating the matter following the viral video.
Web Summary : अहमदाबाद-साबरमती एक्सप्रेस में एक व्यक्ति जिंदा सांप लेकर यात्रियों को डराकर पैसे वसूल रहा था। मुंगावली और बीना जंक्शन के बीच हुई इस घटना से आक्रोश फैल गया। वायरल वीडियो के बाद रेलवे अधिकारियों ने विवरण मांगा और मामले की जांच कर रहे हैं।