शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

Mahashivratri 2021: महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा करताना दिसल्या प्रियांका गांधी; फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 16:51 IST

Mahashivratri 2021: आजच्या पवित्र दिनी प्रियांका गांधींनी भगवान शिवाची मंदिरात जाऊन पूजा केली आहे.

आज देशभरात महाशिवरात्रीचा सण लोक उत्साहात साजरा करत आहे. सगळीकडे लोक 'हर हर महादेव' चा जयघोष करताना दिसून येत आहे. याचेच औचित्य साधून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा  (Priyanka Gandhi Vadra) यांनी इंस्टाग्रामवर आपले खास फोटो शेअर केले आहेत. या माधमातून त्यांनी देशभरातील लोकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पवित्र दिनी प्रियांका गांधींनी भगवान शिवाची मंदिरात जाऊन पूजा केली आहे.

आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रियांका गांधी यांनी महामृत्यूंजय मंत्र (Mahamrityunjaya Mantra) लिहीला आहे. या मंत्राला त्र्यंबकम मंत्र (Rudra Mantra or Tryambakam Mantra) या रुपातही ओळखलं जातं.  महामृत्युंजय मंत्र ऋग्वेदातील एक भाग आहे. भगवान शीवाला रुद्राच्या उपकथेत द थ्री-आइड वन'  नावानं ओळखलं जातं. प्रियांका गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व देशवासियांना शुभेच्छा. भगवान शिव तुम्हा सगळ्यांना आशिर्वाद देवो. सोशल मीडिया युजर्सनी या  फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान काशीमध्ये भोलेनाथांचे दर्शन करण्यासाठी सकाळपासून काशी विश्वनाथांच्या मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.  वाढती गर्दी पाहता प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्थाही केली आहे. याव्यतिरिक्त देशात अनेक भागांमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता विशेष काळजी घेतली जात आहे. अनेक मंदिरांमध्ये रात्रीचा रुद्राभिषेक सुरू झालेला पाहायला मिळाला. तर काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मिरवणूक काढली गेली नाही. ब्रिटनमध्ये सापडलेलं उल्कापिंड अत्यंत दुर्मिळ; 'असा' होणार पृथ्वीवरील जीवनाचा खुलासा, पाहा व्हिडीओ 

दिल्लीतील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिरात भक्तांची रांग पाहायला मिळाली. शिवलिंगावर अभिषेक करून लोक आशिर्वाद घेत आहेत. आंध्रप्रदेशातील चित्तूरमधील श्रीकालहस्ती स्वामींनी लोकांना दर्शन दिले आणि महाशिवरात्रीच्या वार्षिक ब्रम्होत्सव दरम्यान वाहनांसह मिरवणूकीत सहभागी झाले. महाराष्ट्रातील दक्षिण काशीच्या मंदिरातही लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली. उज्जैन महाकाल मंदिरात ब्राम्हण भगवान शिवाला अभिषेक करताना दिसून आले.  काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलMahashivratriमहाशिवरात्रीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस