महाकुंभ मेळ्याला गेल्या १३ जानेवारी २०२५ पासून मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. येथे संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी देशाच्या विविध भागांतून लोक येत आहेत. यात अगदी राजकारणी, चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटी ते सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. आयआयटीचा तरुण असो अथवा बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आदी अनेक जण येथे सन्यास घेतानाही दिसत आहेत. मात्र, यातच काही लोक साधूच्या वेशात ये-जा करणाऱ्यांना त्रास देतानाही दिसत आहेत. नुकताच, ये-जा करणाऱ्यांना काठीने मारतानाचा एका साधूचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. आता या साधूचा एका राजस्थानी व्यक्तीशी 'पंग' झाल्याचा व्हिडिओ देखील जबरदस्त व्हायरल होत आहे.
राजस्थानी व्यक्तीनं शिकवला धडा -खरे तर, कुंभमेळ्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना काठीने मारणाऱ्या या बाबाचा व्हिडिओ इंटरनेटवर जबरदस्त व्हायरल होत होता. हा व्हिडिओ लोक मोठ्या प्रमाणावर शेअरही करत होते. आता याच बाबाचा आणखी एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हयारल होत आहे. यात बाबाचा सामाना एका राजस्थानी व्यक्तीशी झाल्याचे दिसत आहे. यानंतर, संबंधित राजस्थानी व्यक्ती बाबांसोबत भिडली तिने बाबाला धक्का देत धमकी आणि इशाराही दिल्याचे दिसत आहे. यानंतरही संबंधित बाबा राजस्थानी व्यक्तीसोबत आरेरावी करतच होता.
नेमकं काय घडलं? -व्हिडिओच्या सुरुवातीला, पगडी घातलेली एक राजस्थानी व्यक्ती साधूवर भडकलेली दिसत आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना काठीने का मारत आहात, असा सवाल ही व्यक्ती त्या साधूला करत आहे. यावेळी काही लोक संबंधित राजस्थानी व्यक्तीला समजावताना दिसत आहेत की, जाऊ द्या तो साधू मानसिक रुग्ण आहे. मात्र, यावेळी बाबाही पूर्ण जोशात आणि त्या व्यक्तीवर भजकलेले दिसत आहेत. हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून आतापर्यंत हजारो युजर्सनी बघितला आहे. तसेच, अनेक युजर्स या व्हडिओवर लाइक आणि कमेन्ट देखील करताना दिसत आहेत.