पालिका कर्मचाऱ्यांनी केली अंड्याच्या गाडीची मोड-तोड; अन् मुख्यमंत्र्यांच्या मदतीने कुटुंबाचं नशिबच पालटलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 03:05 PM2020-07-26T15:05:00+5:302020-07-26T15:30:54+5:30

पालिका कर्मचाऱ्यांनी अंड्याच्या गाडीचं नुकसान केल्यानंतर आता या कुटुंबाचं नशिबंच पालटलं आहे.

Madhya pradesh indore egg seller paras got financial help from many after viral video | पालिका कर्मचाऱ्यांनी केली अंड्याच्या गाडीची मोड-तोड; अन् मुख्यमंत्र्यांच्या मदतीने कुटुंबाचं नशिबच पालटलं

पालिका कर्मचाऱ्यांनी केली अंड्याच्या गाडीची मोड-तोड; अन् मुख्यमंत्र्यांच्या मदतीने कुटुंबाचं नशिबच पालटलं

Next

इंदूर: मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दोन दिवसांपूर्वी पालिका कर्मचाऱ्यांनी एका १४ वर्षीय मुलाच्या अंड्याच्या गाडीवरील सगळी अंडी फेकून दिल्याने प्रचंड नुकसान झालं. ही घटना सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली.  या लहान मुलाचे नाव पारस रायरकवार आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी अंड्याच्या गाडीचं नुकसान केल्यानंतर आता या कुटुंबाचं नशिबंच पालटलं आहे.

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या मुलाची मदत करण्यासाठी देशभरातून मदतीचे हात पुढे आले. एनडी टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्याकडून या कुटुंबाला संपर्क करण्यात आला.  काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सुद्धा या कुटुंबाची मदत केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंड्याचे विक्रेते असलेल्या कुटुंबाच्या खात्यात ५ लाख रुपये जमा केले आहेत. 

एकवेळ अशी होती, की हा १४ वर्षीय मुलगा आणि त्याच्या आजोबांना एक एक अंड विकण्यासाठी खूप मेहनत करावी लागायची. आता मात्र मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केला आहे. त्यामुळे कोणाकोणाची मदत स्विकारायची असा प्रश्न या कुटुंबाला पडला आहे. पारसच्या आजोबांनी सांगितले की, सध्या आम्हाला मदतीसाठी अनेकजणांचे फोन येत आहेत. राहुल गांधी यांच्या कार्यालयातून आम्हाला फोन आला असून त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडूनही पाच लाख रूपये खात्यात जमा करण्यात आले आहेत. 

मध्य प्रदेशची माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी या १४ वर्षीय मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय इंदूरचे आमदार रमेश मेंदोला यांनी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एक घर या कुटुंबाला मिळवून देण्याची घोषणा केली आहे. इतकंच नाही तर पारसला शाळेत जाण्यासाठी सायकल आणि आर्थिक मदत पुरवली आहे. देशभरातून या कुटुंबियांच्या मदतीसाठी अनेकांचे हात पुढे येत आहेत.

गरिबानं जगायचं कसं?... १४ वर्षीय मुलानं लावली अंड्याची गाडी, पालिका कर्मचारी आले अन् मग....

व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण

Web Title: Madhya pradesh indore egg seller paras got financial help from many after viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.