लॉकडाऊनमध्ये तुम्हालाही हेवा वाटेल अशी मजा करतायत 'ही' माकडं, पहा व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 17:56 IST2020-04-13T16:53:38+5:302020-04-13T17:56:29+5:30
ऐरवी माणसांना घाबरून लपून बसत असलेल्या प्राण्यांनी मजा करायला सुरूवात केली आहे. असाच एक व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

लॉकडाऊनमध्ये तुम्हालाही हेवा वाटेल अशी मजा करतायत 'ही' माकडं, पहा व्हायरल व्हिडीओ
सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांना घरी राहण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही वाहनं रस्त्यावर येत नाही. माणसांचा वावर नाही. म्हणून निर्सगातील प्राणी, पक्षांनी मुक्तपणे संचार करायला सुरूवात केली आहे. ऐरवी माणसांना घाबरून लपून बसत असलेल्या प्राण्यांनी मजा करायला सुरूवात केली आहे. असाच एक व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर टिस्का चोप्राने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माकडं स्विमिंग पूलमध्ये आनंद लुटताना दिसून येत आहेत. यात एक माकड बाल्कनीत आहे तर दुसरा स्विमिंग पूलमध्ये मस्ती करत आहे.
या व्हिडीयोला जवळपास २ लाख व्हिव्हज मिळाले आहेत. तर ७०० लोकांनी या व्हिडीओवर कंमेट्स केल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊन किती दिवस सुरू राहील याबाबत काहीही अंदाज नाही. पण या कालावधीत प्राणी, पक्षांना शांततेत आपल्याला हवं तसं जगायला मिळत आहे.