धक्कादायक! कोरोनामुळे शिक्षकाची नोकरी गेली; पोट भरण्यााठी विकायचा गांजा, 'असं' पितळ उघडं पडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 06:31 PM2020-10-01T18:31:37+5:302020-10-01T19:13:52+5:30

कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगार मिळणं बंद झालं तर कोणाची पगार कपात झाली. याचा परिणाम सर्वच क्षेत्रातील लोकांवर पाहायला मिळाला.

Lockdown Effect : Teacher arrested for drug peddling from bengaluru | धक्कादायक! कोरोनामुळे शिक्षकाची नोकरी गेली; पोट भरण्यााठी विकायचा गांजा, 'असं' पितळ उघडं पडलं

धक्कादायक! कोरोनामुळे शिक्षकाची नोकरी गेली; पोट भरण्यााठी विकायचा गांजा, 'असं' पितळ उघडं पडलं

googlenewsNext

(Image Credit- Times of India)

कोरोनाच्या माहामारीमुळे अनेकांच्या जीवनावर प्रतिकुल परिणाम झाला. वाढता कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी होत नसल्यानं लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. याचा परिणाम सर्वसामान्यांवर झाला. कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगार मिळणं बंद झालं तर कोणाची पगार कपात झाली. याचा परिणाम सर्वच क्षेत्रातील लोकांवर पाहायला मिळाला. अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांना कित्येक महिने पगार मिळाला नाही. अशा स्थितीत एका शिक्षकाने पोट भरण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी वाईट मार्गाचा अवलंब केला. 

कर्नाटकातील किशनपूरा येथे आयटीआय महाविद्यालयात किरण मुलांना शिकवायचा. लॉकडाऊनदरम्यान पैसे मिळवण्याासाठी त्याने गांजा विकायला सुरू केली. पोलिसांनी चौकशीदरम्यान प्रश्न विचारल्यास अनेक महिने पगार न मिळल्यानं हे पाऊल उचल्याचे शिक्षकाने सांगितले.  या प्रकरणात पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.  या तिघांकडे मिळून एकूण १२७ किलो गांजा होता. एक कार आणि तीन मोबाईल्सही त्यांच्याकडे होते.  २४ वर्षीय अदिगारा कालाहली आणि २२ वर्षीय महिपाल पी हे किरणचे साथिदार संगारेड्डी येथिल रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सगळ्यात आधी असगरला पकडले. त्यानंतर किरण आणि त्याचे सहकारी ड्रग्स विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर किरणला पोलिसांनी ताब्यात घेतलं. किरणने पोलिासांना सांगितले की,'' लॉकडाऊनमध्ये पगार मिळत नव्हता. माझ्या वडिलांची शेती आहे. त्यातून मिळणारं उत्पन्न खूपच कमी आहे. म्हणून  थोडीफार कमाई होईल या उद्देशानं फरिदाबादवरून गांजा विकत घेऊन बिडार येथे विकण्याचं ठरवलं. नंतर माझी ओळख महिपालशी झाली. महिपालनेही डिग्री घेतली असून आतापर्यंत नोकरी मिळालेली नाही. म्हणून हे काम करायचं ठरवलं. ''

Web Title: Lockdown Effect : Teacher arrested for drug peddling from bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.