या चिमुकलीत आहे सॉलिड टॅलेंंट, चटकन करते कोणाचीही नक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 21:30 IST2021-07-02T21:29:42+5:302021-07-02T21:30:31+5:30

सध्या सोशल मिडियावर एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत ती अ‍ॅक्टिग करतेय. तिची अ‍ॅक्टिंग इतकी छान आहे की भलेभले तिच्यावर फिदा झाले आहेत. ती दिसायला एकतर गोंडस, त्यात तिने घातलीय साडी आणि ती झालीय सासू...

This little girl have solid talent, easily imitates anyone | या चिमुकलीत आहे सॉलिड टॅलेंंट, चटकन करते कोणाचीही नक्कल

या चिमुकलीत आहे सॉलिड टॅलेंंट, चटकन करते कोणाचीही नक्कल

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म बऱ्याच टॅलेंट कारागिरांची मायानगरी झाला आहे. यावर अनेकजण आपल्या अंगातील टॅलेंट सर्वांसमोर दाखवत असतात. लहानगेही याच्यामध्ये मागे नाहीत. सध्या सोशल मिडियावर एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत ती अ‍ॅक्टिग करतेय. तिची अ‍ॅक्टिंग इतकी छान आहे की भलेभले तिच्यावर फिदा झाले आहेत. ती दिसायला एकतर गोंडस, त्यात तिने घातलीय साडी आणि ती झालीय सासू.

वान्या दत्ता असं या गोंडस चिमुकलीचं नाव आहे. ती नकला तर इतक्या सुंदर करते की तिचे भरपूर चाहते आहेत. आत्ताच तिने एक व्हिडिओ रील पोस्ट केली होती. सध्या ही व्हिडिओ रील समाजमाध्यमांवर सर्वाच्या आवडीचा विषय बनली आहे. या व्हिडिओ रिलमध्ये ही चिमुकली सासु झालीय. मस्त साडी नेसून डोक्यावर टिकली लावून ही सासू झालीय. सासू बनून ही सुनेला सांगतेय की पोळी कशी बनवायची. इतकचं नव्हे तर सुनेची भूमिकाही हिनेच केलीय. त्यासाठी तिने वेगळा गेटअप केलाय. ऑरेंज साडी आणि डोक्यावर ऑरेंज टिकलीमधली ही छोटीशी सुन एकदम छान दिसतेय. ती सासूला विचारतेय की पोळी किती मीटर लांब करू? किती जाड करू? किती रुंद करू? तिच्या या प्रश्नांनी सासू चांगलीच चक्रावून गेलीय. इन्स्टाग्रामवर या वान्न्या दत्ताचे जवळपास ४ हजारापर्यंत फॉलोवर्स आहेत. तिने हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आतापर्यंत तिला ३६ हजार लाईक्स मिळाले. १० लाखापेक्षा जास्त जणांनी हा व्हिडिओ पाहिला.
 

Web Title: This little girl have solid talent, easily imitates anyone