Little Girl Cute Dance Video: कोरोना संकटानंतरचा सर्वात क्यूट डान्स; बादशाहच्या गाण्यावर पोरीचा तहलका, इंटरनेट शहारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:50 IST2022-03-30T14:49:07+5:302022-03-30T14:50:24+5:30
Little Girl Dance Video: बॉलीवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाहचे गाणे 'जुगनू' वर एवढा जबरदस्त डान्स केला आहे, की सोशल मीडियावर तहलका माजला आहे.

Little Girl Cute Dance Video: कोरोना संकटानंतरचा सर्वात क्यूट डान्स; बादशाहच्या गाण्यावर पोरीचा तहलका, इंटरनेट शहारले
इंटरनेटवर आजवर तुम्ही खूप गोष्टी पाहिल्या असतील. खूपसारे डान्सचे व्हिडीओ देखील पाहिले असतील, आनंद घेतला असेल. पण आज जो व्हिडीओ आहे, तो खतरनाक म्हणजे खतरनाक आहे. कोरोना संकटानंतर असा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल. कारण तेव्हा शाळाच सुरु नव्हत्या.
बॉलीवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाहचे गाणे 'जुगनू' वर एवढा जबरदस्त डान्स केला आहे, की सोशल मीडियावर तहलका माजला आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतील लहान मुले डान्स करत आहेत. त्यात एक मुलगी आहे, तिच्यासारखा डान्स या वयात क्वचितच कोणाला जमेल.
स्कूलच्या या मलीचा डान्स सोशल मीडियावर भारीच भाव खाऊन गेला आहे. सर्वांच्या नजरा तिने आपल्याकडे वळविल्या आहेत. डान्सच एवढा जबरदस्त आहे, लाखो लोकांनी लाईक केले आहे. तुम्हीही पहा...
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर डीजे माँटी नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने म्हटले आहे की, एका लहान मुलीमध्ये मी एवढी एनर्जी कधीच पाहिली नाही, हा व्हिडीओ मला हैराण करत आहे. तिचे एक्स्प्रेशेन एवढे जबरदस्त आहेत, की कोणीही फिदा होईल. सिनेमांच्या हिरोईनही फिक्या पडतील.