लय भारी! घरोघरच्या बायकांना लाजवेल अशी चपाती लाटत आहे 'हा' चिमुरडा, पहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 18:13 IST2020-04-22T18:01:48+5:302020-04-22T18:13:28+5:30
या व्हिडीओत एक चिमुरडा चक्क चपाती लाटताना दिसून येत आहे.

लय भारी! घरोघरच्या बायकांना लाजवेल अशी चपाती लाटत आहे 'हा' चिमुरडा, पहा व्हिडीओ
घरोघरी लहान मुलं लॉकडाऊनमुळे कंटाळून मोबाईलला चिकटून बसले आहेत. पण काही लहान मुलं अशी सुद्धा आहेत जी जेवण बनवण्यासाठी आपल्या घरच्यांना मदत करत आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक चिमुरडा चक्क चपाती लाटताना दिसून येत आहे.
कधीकधी बायकांना सुद्धा काम करायचा कंटाळा येतो. पण या व्हिडीओतील मुलगा ज्याप्रकारे चपाती लाटत आहे. ते पाहून कौतुक करण्याचा मोह तुम्हालाही आवरता येणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कणकेचा गोळा पीठात घोळवत गोल चपाती या लहानग्याने तयार केली आहे. या मुलाच्या तोंडावरचे हावभाव खूप निरागस आणि क्यूट आहेत.
I am stunned. This is truly extraordinary for a teeny tiny to make it with such panache!👌
— ProfMKay🇮🇳 (@ProfMKay) April 20, 2020
pic.twitter.com/NmwCuQe88m
@ProfMKay या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 'मी पाहून हैराण आहे'. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत दोन लाख व्हिव्हज आणि पाच हजार लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला आहे. याबाबत अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. सोशल मीडियावर या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.