प्राणी कोणतेही असो ते नेहमीच शिकारीच्या शोधात असतात. शिकारीसाठी अनेक प्राणी वेगासोबत चलाखीचाही वापर करतात. याने त्यांना शिकार करण्यात यश मिळण्याचं प्रमाण जास्त राहतं. पण कधी कधी त्यांना नुकसानही होतं. तेच काही प्राणी असेही असतात जे इतक्या वेगाने शिकारीवर अटॅक करतात की समोरच्याला विचार करायलाही संधी मिळत नाही. सोशल मीडियावर असाच एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत.
सामान्यपणे सिंहाला पाहून दुसरे प्राणी पळून जातात. कारण ते उशीर न करता थेट शिकारीवर झ़डत घेतात. पण या व्हिडीओ तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळेल. इथे एक सिंह चलाखीने आणि वेगाने जिराफाची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. पण खेळ सगळा उलटा होतो. सिंह हा खेळ आयुष्यभर लक्षात ठेवेल. एक सिंह जिराफची शिकार करण्याच्या प्रयत्नात होता. पण तसं काही झालं नाही.
व्हिडीओत बघू शकता की, एका मैदानात अचानक एक सिंह जिराफवर हल्ला करतो. जिराफ वेगाने सिंहाकडे येत असतो. जसा जिराफ सिंहाजवळ पोहोचतो, सिंह त्याच्या मानेला तोंडात पकडण्याचा प्रयत्न करतो. पण सिंह हल्ला हवेत उडले. त्यानंतर जिराफ सिंहाला लाथांनी तुडवतुडव तुडवतो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ ‘Life and nature’ द्वारे शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यावर लोक हैराण झाले आहेत. आतापर्यत या व्हिडीओला चार हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.