शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: मगर आणि सिंहांची फाईट, वातावरण टाईट! पाहा शेवटी कोण जिंकल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 12:22 IST

३ सिंहांचा कळप मगरीची शिकार करण्यासाठी येतो, मात्र त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याऐवजी मगर त्यांना बरोबरीची स्पर्धा देताना दिसते. एकदा तर हे सिंह मगरीला जवळपास आपल्या तावडीत घेतातच मात्र पुन्हा मगर त्यांच्या तावडीतून आपला बचाव करते.

असं म्हणतात की जंगलाचा एकच नियम असतो, जो ताकदवर असतो तो राज्य करतो आणि तो दुर्बल असतो त्याचं आयुष्य इथे खूपच कमी असतं. जंगलातील प्राण्यांना त्यांची भूक भागवण्यासाठी इतर प्राण्यांना मारावं लागतं आणि त्या हल्ल्यातून जे वाचतात, त्यांचं आयुष्य आणखी काही दिवसांसाठी वाढतं. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिंह आपली भूक भागवण्यासाठी मगरीवर हल्ला करताना दिसत आहेत (Lion Crocodile Fight Video).

सहसा सिंहांना पाहून कोणताही प्राणी घाबरतो. जर ते आपली गँग घेऊन आले तर समोरचा प्राणी जिवंत राहील याची शक्यता जवळपास संपूनच जाते आणि सिंह या प्राण्याची शिकार करणार, ही शक्यता दाट असते. मात्र, समोरच्या प्राण्याची शक्ती आणि विश्वास भरपूर असेल तर तो सिंहालाही पळवून लावू शकतो. याचाच प्रत्यय देणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सिंह हा जंगलाचा राजा आहे आणि त्याच्या पराक्रमाचा सामना करणं सोपं नाही. हरणांसारख्या नाजूक प्राण्यांपासून ते रान म्हैस आणि पाण्यात असलेल्या मगरीपर्यंत बलाढ्या प्राण्यांची शिकार करण्यातही सिंह पटाईत असतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिंहांचा कळप आणि मगरी यांच्यातील झुंज दिसत आहे. ३ सिंहांचा कळप मगरीची शिकार करण्यासाठी येतो, मात्र त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याऐवजी मगर त्यांना बरोबरीची स्पर्धा देताना दिसते. एकदा तर हे सिंह मगरीला जवळपास आपल्या तावडीत घेतातच मात्र पुन्हा मगर त्यांच्या तावडीतून आपला बचाव करते.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर lionsdaily_नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 64 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या लढाईचा शेवट काहीही झाला असो, मात्र लोक यातील मगरीच्या आत्मविश्वासाचं कौतुक करत आहेत. तिने शेवटपर्यंत हार मानली नाही. याआधी एका जिराफाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. हे जिराफही सिंहांनी भरपूर प्रयत्न करूनही त्यांच्या तावडीत सापडलं नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम