शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ! दोन हरणांचं झालं भांडण, बिबट्याने घेतला फायदा अन् केली शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 14:43 IST

दोन हरणाच्या भांडणाचा पुरेपूर फायदा उचलला तो एका बिबट्याने (Leopard Deer video). आपसातील भांडणामुळे हरणं बिबट्याची शिकार झाली.

दोन मांजरांच्या भांडणाचा एक माकडाने फायदा घेतल्याची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. दोघांच्या भांडणार तिसऱ्याचा लाभ अशी ही बोधकथा. हे प्रत्यक्षातही दिसून आलं आहे. दोन हरणाच्या भांडणाचा पुरेपूर फायदा उचलला तो एका बिबट्याने (Leopard Deer video). आपसातील भांडणामुळे हरणं बिबट्याची शिकार झाली आहेत (Leopard attack on deer).

हरण आणि बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात हरणांचा कळप आहे आणि तिथं शिकार करण्यासाठी एक बिबट्या पोहोचला. यावेळी दोन हरणांमध्ये जुंपली. ते भांडणात इतके व्यस्त झाले की त्यांची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याकडेही सुरुवातीला त्यांचं लक्ष गेलं नाही आणि अखेर आपसातील भांडणामुळे ते बिबट्याचे शिकार झाले.

व्हिडीओत पाहू शकता जंगलात हरणांचा कळप दिसतो आहे. दोन हरणं एकमेकांना मारत आहे. आपल्या शिंगांनी एकमेकांवर वार करताना त्यांची शिंगं एकमेकांमध्ये अडकतात. ते दोघंही आपली शिंग सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना ते शक्य होत नाही.

त्याचवेळी तिथं एक बिबट्या पोहोचतो. बिबट्याला पाहताच हरणं घाबरता आणि त्याच अवस्थेत त्याच्यापासून दूर पळतात. जसजशी हरणं फिरतात तसतसा बिबट्याही त्यांच्या मागेमागे फिरताना दिसतो. या व्हिडीओत तरी हरणं या बिबट्याची शिकार झाली की नाही हे दिसत नाही आहे. पण किमान एका तरी हरणाची बिबट्याने शिकार केली असावी.

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपसातील भांडणात हरणांची शिंगं एकमेकांमध्ये अडकली. संधीचा फायदा घेऊन बिबट्या त्यांच्यावर हल्ला करायला पोहोचला. जगही असंच आहे. आपसातील भांडणाचा फायदा कुणी दुसरंच घेतं. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरleopardबिबट्या