शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Video : कष्टकरी बळीराजाला सलाम! जगाच्या पोशिंद्याला 'असं' राबताना पाहून नेटिझन्स भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 19:12 IST

सोशल मीडिया  युजर्सनी या बळीराजाच्या प्रयत्नांना दाद दिली आहे अनेकजण भावूक झाले आहेत. तर काहींनी जुगाड केल्याचे म्हटलं आहे.

सोशल मीडियावर तीन शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना बळीराजाच्या या अवस्थेची दया येत आहे तर अनेकजण भावूक झाले आहेत. या व्हिडीओमध्ये शेतकरी चिखलात लावणी करताना दिसून येत आहे. यंत्रसामग्रीच्या अभावामुळे अशाप्रकारे झोपून पीकाची लावणी करण्याची वेळ आली आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की,  पुढे उभी असलेली दोन माणसं पोटावर झोपलेल्या अवस्थेत असलेल्या माणसाला खेचत आहेत. आणि जसंजसं पुढे जात आहे तसतसं वेगाने प्रत्येक ठिकाणी लावणी करत पुढे सरकत आहे.

 तुम्हाला दिसून येईल की या माणसाचे  संपूर्ण अंग चिखलानं माखलेलं आहे. हा व्हिडीओ  कधी आणि कुठे काढण्यात आला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. सोशल मीडिया  युजर्सनी या बळीराजाच्या प्रयत्नांना दाद दिली आहे अनेक  भावूक झाले आहेत. तर काहींनी जुगाड केल्याचे म्हटलं आहे.

हा व्हिडीओ अरशद वारसी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत काही तासात  १४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि १ हजारांपेक्षा जास्त रिट्विटस मिळाले आहे. तर तब्बल २ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

असाच एक व्हिडीओ याआधीही व्हायरल झाला होता. एका शेतकऱ्यानं आपला एक पाय गमावला आहे. अशा स्थितीतही भर पावसात चिखलातून एका पायाचा आधार घेत बळिराजानं आपलं काम सुरू ठेवलं आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात रोज काम करून कंटाळला असाल किंवा कष्ट करण्यापासून लांब पळण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी नक्की प्रेरणादायी ठरेल. आयएफएस अधिकारी मधुमिथा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, या व्हिडीओतील शेतकऱ्याला शब्दांनी न्याय दिला जाऊ शकत नाही. 

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. एक पाय नसतानाही शेतात हा बळीराजा राबत आहे. न डगमगता उत्साहात आणि जद्दीने बळीराजानं आपलं काम सुरू ठेवलं आहे.  या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहेत.  १६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे तर ३ हजार लोकांना हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकजण निशब्द झाले आहेत. 

हे पण वाचा-

सभागृहात टॉपलेस तरूणीचा फोटो बघताना आढळला खासदार, म्हणे - 'तिला मदत करत होतो'

शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा

बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ

लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेFarmerशेतकरी