चीनच्या सोशल मीडियात धुमाकूळ घालणारी ट्रम्प प्रशासनातील 'ही' सर्वात कमी वयाची अधिकारी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 13:34 IST2025-03-13T13:33:10+5:302025-03-13T13:34:00+5:30
२०२२ साली लेविटने अमेरिकन काँग्रेसची निवडणूक लढवली. न्यू हॅम्पशायर काँग्रेस जिल्हा प्रतिनिधित्व करण्यासाठी रिपल्बिकन पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला परंतु निवडणुकीत पराभव सहन करावा लागला.

चीनच्या सोशल मीडियात धुमाकूळ घालणारी ट्रम्प प्रशासनातील 'ही' सर्वात कमी वयाची अधिकारी कोण?
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर टॅरिफबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अनेक देशांना धक्का बसला. त्यात चीन आणि अमेरिकेत सध्या ट्रेड वॉर सुरू आहे. यातच डोनाल्ड ट्रम्प यांची निकटवर्तीय सहकारी चीनच्या इंटरनेट जगतात धुमाकूळ घालत आहे. इतिहासात सर्वात कमी वयाची व्हाइट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट मागील महिन्यात चीनमध्ये एक सोशल मिडिया सेलिब्रिटी म्हणून पुढे आली आहे. २७ वर्षीय कॅरोलिनचा अमेरिकेतली पत्रकारांशी भिडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
शेडोंग प्रांतातील एक सोशल मिडिया युजर झांग जीयी यांनी कॅरोलिन लेविटचा ४३ सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट करून म्हटलंय की, या सुंदर प्रवक्त्याची बेधडकता आणि स्वभाव पाहा. कुणीही निराश नाही. फक्त शांत आणि कुठल्याही दबावाविना आपल्या कामाबद्दल सजग आहे असं सांगितले. या क्लिपमध्ये लेविट एका प्रश्नाला उत्तर देताना दिसते. ट्रम्प यावर्षी व्हाइट हाऊसच्या कॉरेस्पोंडेंट्स असोसिएशनच्या डिनरमध्ये सहभागी होणार का असं विचारलं होते. त्याला कॅरोलिन लिवेट उत्तर देते.
कोण आहे कॅरोलिन लेविट?
न्यू हॅम्पशायर राज्याच्या ७ हजार लोकसंख्येच्या छोट्या शहरात जन्मलेली लेविट तिच्या कुटुंबातील कॉलेजमध्ये पदवी घेतलेली पहिली महिला होती. ट्रम्प प्रशासनाच्या पहिल्या कार्यकाळात असिस्टेंट प्रेस सेक्रेटरी आणि प्रेसिडेंशियल रॉयटर होती. २०२१ मध्ये तिने न्यूयॉर्कच्या रिपल्बिक काँग्रेस सदस्य एलिस स्टेफनिक यांच्याकडे काही काळ काम केले, ज्यांनी ट्रम्प यांना संयुक्त राष्ट्रात अमेरिकन राजदूत म्हणून सर्व्हिस देण्यासाठी नॉमिनेट केले होते. २०२२ साली लेविटने अमेरिकन काँग्रेसची निवडणूक लढवली. न्यू हॅम्पशायर काँग्रेस जिल्हा प्रतिनिधित्व करण्यासाठी रिपल्बिकन पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला परंतु निवडणुकीत पराभव सहन करावा लागला.
अलीकडेच लेविटचं निकोलस रिकियो यांच्याशी लग्न झाले. जे एक रियल इस्टेट डेवलपर आहेत आणि लेविटपेक्षा वयाने ३२ वर्ष मोठे आहेत. लेविट ट्रम्प यांच्यासोबत काम करणारी एकमेव अमेरिकन पब्लिक फिगर नाही तर चीनच्या सोशल मीडियावर हिट झाली आहे. लेविट हिच्या बोलण्याची शैली सर्वांना आवडत आहे. लेविट २७ वर्षाची असून ती व्हाईट हाऊसमधील सर्वात कमी वयाची युवा प्रेस सेक्रेटरी आहे.