मच्छर मारण्याचा विदेशी जुगाड, बघितल्यावर विश्वास बसणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 18:22 IST2021-06-30T18:21:44+5:302021-06-30T18:22:32+5:30

तुम्हाला रात्रीच्या वेळी मच्छर हैराण करत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. इंटरनेटवर एक असा जुगाड व्हायरल होतोय ज्याला पाहुन प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसतोय. हा जुगाड मच्छरपासून तुम्हाला सुटका देईल. बघुया काय आहे हा जुगाड...

Jugad to kill mosquitoes, you can't believe it ... | मच्छर मारण्याचा विदेशी जुगाड, बघितल्यावर विश्वास बसणार नाही...

मच्छर मारण्याचा विदेशी जुगाड, बघितल्यावर विश्वास बसणार नाही...

तुम्हाला रात्रीच्या वेळी मच्छर हैराण करत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. इंटरनेटवर एक असा जुगाड व्हायरल होतोय ज्याला पाहुन प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसतोय. हा जुगाड मच्छरपासून तुम्हाला सुटका देईल. मस्किटो ट्रॅप नावाने हा जुगाड व्हायरल होत आहे. अनेकजण हा जुगाड बघुन तोंडात बोटं घालत आहेत. हा जुगाड पोस्ट करणाऱ्याने म्हटलेही आहे की या जुगाडाचे पेटंट तिला श्रीमंत बनवेल. बघुया काय आहे हा जुगाड...
 

मच्छर जेव्हा तुमचे रक्त शोषते तेव्हा तुम्हाला तिचा भरपूर राग येत असेल ना? ही मच्छर चावली आणि खाज आली की ती मच्छर कधी एकदा मारतो असे तुम्हाला होत असेल. मग हा एक नवीन जुगाड तुम्ही नक्की ट्राय करा.


ही पोस्ट ट्विटर युजर @ज्युडियाना हिने शेअर केली आहे. ज्यात चार गोष्टी दिसत आहेत. मीठ, बाटलीचे बूच, काठी आणि दगड. हा फोटो शेअर करून त्या खाली तिने अशी कॅप्शन टाकलीये की याचं मला पेटंट मिळवून मी श्रीमंत होईन. या ट्वीटला ही बातमी लिहेपर्यंत ५१६ रीट्वीट आणि २ हजारच्या वर लाईक्स मिळाले होते. त्यांनी असं म्हटलंय की, हा मस्किटो ट्रॅप असा आहे की ज्यात सुरुवातीला मीठ आहे ज्यावर मच्छर साखर समजून बसेल पण मीठ असल्याने तिला तहान लागेल. त्याच्या बाजूच्या बुचात टकिला आहे. ती पिऊन मच्छर लाकडाच्या काठीवर बसेल आणि चक्कर येऊन दगडाला आपटेल.

Web Title: Jugad to kill mosquitoes, you can't believe it ...