शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

Groom Jugaad Viral Video: भन्नाट जुगाड! नवरदेवाने घोड्यावर स्वार होण्याऐवजी मारली अनोखी एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 21:20 IST

वधूची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा खास अंदाज

Groom Jugaad Viral Video: भारतात वर जेव्हा वधूच्या घरी वरात घेऊन पोहोचतो त्यावेळी तो घोडीवर बसून वाजत-गाजत येतो. हिंदू धर्मात घोड्यावर स्वार होण्याची प्रथा आहे. पण नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये वराची एन्ट्री वेगळी आणि धमाकेदार आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल. वराची विचारसरणी तुम्हाला खरंच आश्चर्यचकित करेल आणि त्याच्या जुगाडू स्टाईलने तुम्हीदेखील त्याचे चाहते व्हाल.

वराचा असा व्हिडिओ तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी नेहमीच प्राण्यांना त्रास न देता लग्नाची योजना आखली होती. लग्नसमारंभात जनावरांना जड कपडे घातले जातात आणि कधी कधी दारू पिण्यास भाग पाडले जाते हे मी पाहिले आहे. त्यामुळे वराची एंट्री जनावरांना त्रास न देता व्हावी अशी माझी इच्छा होती अन् माझ्या नवऱ्याने ती इच्छा पूर्णदेखील केली. वधूने तिच्या इच्छेबद्दल वराला सांगितले आणि वराने त्याच्या कुटुंबाला वधूची इच्छा पटवून दिली. त्यानुसार विधी घोडीशिवाय पार पडला. घोडीऐवजी वर आपल्या भावाच्या खांद्यावर बसून स्टेजवर आला. कोविड महामारीच्या काळात वधू-वरांचे लग्न झाले होते, असेही कॅप्शनमध्ये वधूने म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंदही पाहायला मिळाला. Viral Video मध्ये पाहा नवरदेवाने नक्की काय केला जुगाड-

वराने केलेल्या या अनोख्या जुगाडाची चांगलीच चर्चा रंगली आहे. ही स्टाईल नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले आहेत. इतकेच नाही तर काहींनी हार्टचे इमोजीही पोस्ट केले आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलmarriageलग्न