बापरे! जंगलात झोपलेल्या सिंहाची कोल्ह्याने काढली खोड, अन् मग.... पाहा व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 18:42 IST2020-06-18T18:34:54+5:302020-06-18T18:42:17+5:30
व्हिडीओमध्ये चक्क सिंहाची खोड काढण्याचा प्रयत्न केला आहे. होय, कोल्ह्याने शांत झोपलेल्या सिंहाची खोड काढली आहे.

बापरे! जंगलात झोपलेल्या सिंहाची कोल्ह्याने काढली खोड, अन् मग.... पाहा व्हायरल व्हिडीओ
लॉकडाऊनमध्ये प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या मुक्त संचार तुम्ही पाहीला असेल. नेहमी माणसांना घाबरणारे प्राणी लॉकडाऊनमध्ये मात्र स्वच्छ पर्यावरणाचा आनंद लुटताना दिसून आले. सोशल मीडियावर वन्य प्राण्याचे वेगवेगळे व्हिडीओ या कालावधीत व्हायरल झाले. असाच एक व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या व्हिडीओमध्ये चक्क सिंहाची खोड काढण्याचा प्रयत्न केला आहे. होय, कोल्ह्याने शांत झोपलेल्या सिंहाची खोड काढली आहे.
One can resist everything except temptation 😔 pic.twitter.com/UxIa5Q4tXv
— Susanta Nanda (@susantananda3) June 18, 2020
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. सिंह झाडाखाली आराम करत होता. तितक्यात काही अंतरावरून एक कोल्हा येतो आणि सिंहाची शेपटी खेचून पळ काढतो. नंतर सिंह दचकून उठतो इकडे तिकडे बघतो पण सिंह उठेपर्यंत कोल्हा तिथून पसार झालेला असतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांना भीती वाटत असेल. कारण सिंहाची खोड काढणं काही सोपे नव्हे.
हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
नोकरी गेली, म्हणून आजोबांनी सुरू केलं यु-ट्यूब चॅनेल; अन् महिन्याभरात केली कमाल....
'या' फोटोमधील पोपटांची आणि सापांची संख्या शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का हे चॅलेन्ज