शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मटर पनीरऐवजी 'चिकन करी' देणं पडलं महागात; रेस्टॉरंटला भरावा लागला २० हजारांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 14:32 IST

शाकाहारी पदार्थाऐवजी मांसाहारी पदार्थाची डिलिव्हरी झाल्यामुळे रेस्टॉरंटला २० हजारांचा दंड भरावा लागला आहे.

ग्वाल्हेर

आजच्या धावपळीच्या जगात ऑनलाइन व्यवहाराचे प्रमाण वाढले असून यामध्ये ऑनलाइन जेवण मागवण्याचेही प्रमाण अधिक आहे. अनेकवेळा चुकीच्या ऑर्डर दिल्याची अनेक प्रकरणे समोर येत असतात. मात्र जर शाकाहारी व्यक्तीला चुकून मांसाहारी जेवण दिले गेले तर मोठी गडबड होऊ शकते. कारण एका व्यक्तीच्या छोट्याश्या चुकीमुळे रेस्टॉरंटला काहीवेळा दंडही भरावा लागतो. असेच एक प्रकरण घडले आहे ज्यामुळे एका रेस्टॉरंटला २० हजार रूपयांचा दंड भरावा लागला आहे. ग्वाल्हेरमधील एका कुटुंबाने शहरातील प्रसिद्ध जिवाजी क्लबमधून 'झोमॅटो'वर शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली. मात्र त्यांच्या घरी मटर पनीरऐवजी चिकन करीची डिलिव्हरी मिळाली. 

२० हजार रूपयांचा दंडऑर्डर उघडून पाहताच मटर पनीऐवजी चिकन करी पाहून कुटुंबियांना धक्का बसला. माहितीनुसार, हे कुटुंब शुद्ध शाकाहारी होते, यामुळे घरातील कोणत्याच सदस्याने या ऑर्डरमधील काहीच खाल्ल नाही. आपल्याला आलेल्या वाईट अनुभवामुळे कुटुंबीयांनी या गंभीर प्रकरणाबाबत ग्राहक मंचात याचिका दाखल केली आणि मंचाने क्लबच्या किचनला तब्बल २० हजार रूपयांचा दंड ठोठावला. 

रिपोर्टनुसार, फोरमच्या एका अधिकाऱ्याने या घटनेचा निषेध करून हा सेवेचा अभाव असल्याचं म्हटलं आहे. हे निष्काळजीपणाचे प्रकरण असून त्यामुळे तक्रारदाराला मानसिक व शारीरिक इजा झाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे दंडाच्या रकमेबरोबरच तक्रारदाराने लढलेल्या खटल्याचा खर्चही भरावा लागणार आहे. यामुळे आपल्याही भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

२६ जून रोजीची घटना उघड जिवाजी क्लबचे स्थायी सदस्य आणि शहरातील रहिवासी सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी २६ जून रोजी मटर पनीरची ऑर्डर दिली. मात्र झोमॅटोने मासांहार दिल्याने क्लबला शिक्षा झाली आहे, यासाठी वकील श्रीवास्तव यांनी तक्रार केली. मात्र जिवाजी क्लबचा सदस्य असून देखील कारवाई झाली नाही. ग्राहक मंचाने या प्रकरणाची सुनावणी करताना जिवाजी क्लबच्या स्वयंपाकघरातील निष्काळजीपणा मान्य करत त्यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय दिला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाonlineऑनलाइनZomatoझोमॅटो